Central Railways Mega Block: मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक सुरु, शनिवार ते सोमवारदरम्यान या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द

10 जानेवारीला म्हणजे सोमवारी मध्यरात्री 2 वाजता हा मेगाब्लॉक संपणार आहे.

Updated: January 8, 2022 2:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Central Railway
Central Railway

Central Railways Mega Block: मुंबई लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे (Central Railways) मार्गावर आज म्हणजे 8 जानेवारीला दुपारी 2 वाजेपासून तब्बल 36 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. 10 जानेवारीला म्हणजे सोमवारी मध्यरात्री 2 वाजता हा मेगाब्लॉक संपणार आहे.

Also Read:

ठाणे आणि दिवा धिम्या मार्गांवर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेच्या पायाभूत सुविधांसाठी हा मेगाब्लॉक (Infrastructure Block) घेण्यात आला आहे. मेगाब्लॉक दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील लोकल आणि लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसवर देखील परिणाम होणार आहे. या कालावधीत धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. तर लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे. नेमक्या कोण-कोणत्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत ते आपण पाहणार आहोत…त्यामुळे बाहेर कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर त्याआधी कोणत्या गाड्या सुरु असणार आहेत हे नक्की पाहा….

शुक्रवारी आणि शनिवारी या रेल्वे गाड्या रद्द –

अमरावती- मुंबई एक्स्प्रेस
नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस
नांदेड- मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

शनिवार आणि रविवारी या रेल्वे गाड्या रद्द –

मुंबई-पुणे-डेक्कन एक्स्प्रेस
मुंबई-जालना -मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
मुंबई-अमरावती एक्स्प्रेस
मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस
मुंबई-गदर एक्स्प्रेस
मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

रविवार आणि सोमवारी या गाड्या रद्द –

आलिदाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
गदर-मुंबई एक्स्प्रेस
पुणे येथे एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
हुबली-दादर एक्स्प्रेस
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस

पुण्याहून रेल्वे गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन –

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
दादर-हुबली एक्स्प्रेस

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 2:42 PM IST

Updated Date: January 8, 2022 2:56 PM IST