Beed Accident: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 15 जखमी

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बस आणि ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Updated: January 9, 2022 12:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Beed Accident
Beed Accident

Beed Accident : बीडमध्ये बस आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये (Beed Bus And Truck Accident) सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या अंबाजोगाई-लातूर मार्गावर (Ambajogai- Latur Road) बर्दापूर जवळील नंदगोपाल डेअरीसमोर हा भीषण अपघात झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बस आणि ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी साडेआठच्या सुमारास बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. लातूरहून औरंगाबादला (Latur to Aurangabad Bus) निघालेल्या एसटीचा अपघात झाला. अंबाजोगाईमधील वळणावर एसटी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण आहे की बचावकार्यासाठी घटनास्थळावर क्रेन बोलवावी लागली. अपघातामध्ये ट्रक आणि बसच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एसटीच्या वाहकाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Beed Police) घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना बसच्या बाहेर काढून अंबाजोगाईमधील स्वामी रामातीर्थ ग्रामीण रुग्णालयात (Swami Ramatirth Hospital) उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठई पाठवण्यात आले आहेत. तसंच त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 12:11 PM IST

Updated Date: January 9, 2022 12:30 PM IST