नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) भीषण अपघातामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर रस्त्यावर (Lasalgaon-Vichur Road) हा अपघात झाला आहे. वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि ॲपेरिक्षा यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात (truck and auto accident) झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.Also Read - Pune Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 12 जण जखमी

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ॲपेरिक्षा आणि समोरुन येणाऱ्या ट्रक यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये ॲपेरिक्षाच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आणि त्यांनी जखमींना तात्काळ लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. Also Read - Breaking News Live Updates: राज ठाकरे यांचा पुणे दौरा अचानक रद्द, आजारी असल्यामुळे घेतला निर्णय

या अपघातामध्ये ॲपेरिक्षामध्ये असेलल्या पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील मृतांमध्ये दोन जण अहमदनगरमधील (Ahmednagar) लोणी प्रवरा येथील आणि दोन जण विंचूर येथील राहणारे आहेत. या अपघातामध्ये सुहास निकाळे (40 वर्षे, रिक्षाचालक, विंचूर), किसन बैरागी (60 वर्षे, धारणगाव खडक), विठ्ठल भापकर (65 वर्षे,लोणी-प्रवरा), भाऊसाहेब नागरे (60 वर्षे, लोणी-प्रवरा) आणि रतन गांगुर्डे (40 वर्षे, इंदिरानगर, विंचूर) यांचा मृत्यू झाला. Also Read - Breaking News Live Updates: Bhima Koregaon Case: माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंगांना समन्स