मुंबई: राज्यातील कोकण (Kokan) आणि पश्चिम महाराष्ट्राला (West Maharashtra) मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) चागलंच झोडपून काढले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या (Landslide) घटना घडल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 85 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक, प्राशासन आणि एनडीआरएफची टीम (NDRF Team) प्रयत्न करत आहे.Also Read - Maharashtra Rain Update : आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा 'यलो' अलर्ट जारी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये (Mahad Landslide) दरड कोसळून सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून संपूर्ण तळीये गाव गुडूप झाले आहे. या गावात एकूण 30 घरं होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही 44 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. एनडीआरएफची टीम आणि स्थानिक प्रशासनाद्वारे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. Also Read - Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर मंदावला, मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी!

रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथे देखील दरड (poladpur landslide) कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. केवनाळे येथे चार घरांवर दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तर सुतारवडीमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही दुर्घटनांमध्ये 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Also Read - Maharashtra Rain Updates : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा!

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात (Khed landslide) देखील दरड कोसळली आहे. धामणंदजवळच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी 12 घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत सहा घरं ढिगाऱ्याखाली गाडले गेली. या दुर्घटनेत 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत तर अजूनही 17 जण बेपत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. तर या दुर्घटनेत 25 जनावरांचा देखील मृत्यू झालाय.

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी (Satara landslide) दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटण तालुक्यात मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे आणि वाई तालुक्यातील कोंडवळी, मोजेझोर अशा एकूण 10 ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर याठिकाणी अजूनही 35 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या सर्व ठिकाणी एनडीआरएफच्या टीम रवाना झाल्या आहेत. पण अद्याप त्या त्याठिकाणी पोहचल्या नाहीत.