Top Recommended Stories

SET-TET Exam 2021: SET आणि TET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाच्या तारखा!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

Updated: August 24, 2021 9:20 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

up tet exam paper leaked

मुंबई : कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राला (Education Sector) मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-कॉलेज (School-College) बंद आहेत. त्यामुळे शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. अशामध्ये शैक्षणिक वेळापत्रक (Academic schedule) पूर्णपणे कोलमडले होते. अनेक परीक्षा रद्द (Exam canceled ) करण्यात आल्या तर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात घेता बऱ्याच परीक्षाचे वेळापत्रक जाहीर होत आहेत. अशामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी राज्य पात्रता परिक्षा (SET Exam) या दोन्ही परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या परिक्षेसाठी नोंदणी (Registration for the exam ) करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत म्हणजे 25 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवार https://mahatet.in/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करु शकतात. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र कोरोनामुळे (Corona) या तारखेत बदल होण्याची शक्यता परिक्षा परिषदेने वर्तवली आहे.

You may like to read

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा –

नोंदणीची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2021

प्रवेशपत्र मिळण्याची तारीख – 25 सप्टेंबर 2021

परिक्षा पेपर 1 – 10 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजता)

परिक्षा पेपर 2 – 10 ऑक्टोबर 2021 (दुपारी 2 ते संध्याकाळी 4.30 वाजता)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) वतीने घेणाऱ्या येणाऱ्या राज्य पात्रता परिक्षेची (SET Exam) तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादीही विद्यापीठाने https://setexam.unipune.ac.in/Home.aspx या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे. परिक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी विद्यार्थी आपले प्रवेशपत्र वेबसाईटवरुन (Website) डायरेक्ट डाउनलोड करु शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेबसाईटकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 24, 2021 9:20 AM IST

Updated Date: August 24, 2021 9:20 AM IST