By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Arjun Khotkar Join Shinde Group : शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश, निर्णय सांगताना अश्रू अनावर
Arjun Khotkar Join Shinde Group : शिवसेनेला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनीही आता शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Arjun Khotkar join Shinde group : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर (Arjun khotkar) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. जालन्यातील पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली. आधीच संकटात सापडलेल्या शिवसेनेला (Shivsena) हा मोठा धक्का आहे. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय मी उद्धव ठाकरेंशी बोलून घेतला असल्याचे खोतकर म्हणाले आहे. ही घोषणा करत असताना खोतकरांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
काय म्हणाले अर्जुन खोतकर?
भूमिका मांडताना अर्जुन खोतकर म्हणाले की, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन मी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला जालन्याच्या विकासामध्ये पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. मी याविषयावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसोबत चर्चा केली. सर्वांशी चर्चा केल्यानंतर मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. हे पक्षाच्या कानावर मी टाकले आहे. त्यामुळे त्यांचे समाधान देखील झालेय.’
शिवसेनेची मी प्रामाणिकपणे सेवा केली आहे
पुढे बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, ‘ मी शिवसेनेच्या तिकिटावर मी 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. मी आजपर्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा केली आहे. मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे संघटन वाढवलं. शिवसेना सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो. सामान्य जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला. अनेक निवडणुकांमध्ये लोकांनी आमच्या पदरात यश टाकले त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचा आभारी आहे. मी पक्षनेतृत्वाचा देखील मी मनापासून आभारी आहे. त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.’
एकनाथ शिंदेंना पाठिंबा का दिला?
एकनाथ शिंदेना पाठिंबा देण्याविषयी ते म्हणाले की, ‘जालन्यामधील साखर कारखान्याविरोधामध्ये ईडीची कारवाई सुरु आहे. या प्रकरणातील अडचणी दूर होतील की नाही याविषयी माहिती नाही, मात्र मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून देण्यात आले आहे. यामुळे मी आज त्यांना माझे समर्थन जाहीर करत आहे. यासोबतच मी माझ्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत आहे.’
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या