Raj Thackeray Aurangabad Sabha : राज ठाकरे यांच्या बहुचर्चित सभेचे काउंटडाऊन सुरू, जाणून घ्या अपडेट्स
Aurangabad Raj Thackeray Sabha : मशिदीवरील भोंगे विरोधात एल्गार पुकारत भोंग्यावरील बंदीसाठी सरकारला ( Maharashtra Government ) अल्टीमेटम दिला आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केली होते. या सभेकडे राज्याचं लक्षं लागलं असून सभेसाठी राज ठाकरे आज (30 एप्रिल रोजी) पुण्याहून ( Pune )औरंगाबाद जाणार आहे.

Aurangabad Raj Thackeray Sabha : राज्यात ( Maharashtra ) सध्या हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे विरोधात एल्गार पुकारत भोंग्यावरील बंदीसाठी सरकारला ( Maharashtra Government ) अल्टीमेटम दिला आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी सभा घेण्याचे जाहीर केली होते. या सभेकडे राज्याचं लक्षं लागलं असून सभेसाठी राज ठाकरे आज (30 एप्रिल रोजी) पुण्याहून ( Pune) औरंगाबाद जाणार आहे. त्यांचा हा दौराही चर्चेत असून सकाळपासूनच मनसे नेते व कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी कारण्यात येत आहे.
Also Read:
- Cylinder Blast In Pune : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने पुणं हादरलं, महिलेचा जागीच मृत्यू, 8 जखमी
- Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीबाबात फडणवीसांच्या दाव्याला संजय राऊतांचं उत्तर
- Maharashtra Gram panchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर! पाहा राज्यात कुठे कोणाचं वर्चस्व?
या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र संस्कृतिक मंडळाच्या मैदनवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या आहे. याच मैदानावरून त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र दिनी होणार्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मनसेने राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथील सभेत काय गर्जना करता याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी
राज ठाकरे हे आज औरंगाबाद रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, त्यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी पार पडणार आहे. पुण्यातील राजमहाल येथे 150 पुरोहितांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला. धार्मिक विधी झाल्यानंतर राज ठाकरे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना होतील. यासह राज ठाकरे पुण्यातून निघल्यानंतर आधी छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधीस्थळी जावून दर्शन घेणार आहे. त्यानंतर ते पुढे औरंगाबाद रवाना होतील.
मनसेविरुध्द शिवसेना संघर्ष…औरंगाबादमध्ये बॅनरबाजी
राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून सध्या राजकारण तापले आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेमुळे मनसेविरुध्द शिवसेना संघर्ष पाहयाला मिळत आहे. हिदुत्वाच्या मुद्यावरून या दोन्ही पक्षात स्पर्धा सुरू आहे. याचाच परिणाम औरंगाबादमधील बॅनरबाजीतून दिसून आला. औरंगाबाद येथे 10 चौकात मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेने ‘खरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब’ अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला उत्तर दिले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या