Aurangabad Raj Thackeray Sabha : अखेर औरंगाबाद सभेसाठी राज ठाकरेंना परवानगी, 'या' आहे अटी-शर्ती!
Aurangabad Raj Thackeray Sabha : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने ( MNS ) आक्रमक पवित्र घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला (Maharashtra Government ) 3 मेचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले असून दररोज काही न काही राजकीय वाद निर्माण होत आहे.

Aurangabad Raj Thackeray Sabha : राज्यात ( Maharashtra ) सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आज दुपारी परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे.
Also Read:
- Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीबाबात फडणवीसांच्या दाव्याला संजय राऊतांचं उत्तर
- Maharashtra Gram panchayat Election Result 2022: ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर! पाहा राज्यात कुठे कोणाचं वर्चस्व?
- Maharashtra Winter Session Highlights: सीमावादावरुन अधिवेशन तापलं! अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने
गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मनसेने राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले असून दररोज काही न काही राजकीय वाद निर्माण होत आहे. अशातच नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या परवानगीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. ABP माझाच्या वृत्तानुसार, यासंदर्भात मनसे नेत्यांसह पोलिस आयुक्तांनीही माहिती दिली आहे. अशातच बुधवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभा स्थळाची पाहणी केली, तसेच त्यांनी पोलिसांची भेट देखील घेतली होती. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी यावेळी केलं आहे. यावेळी औरंगाबादेतील मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली. दरम्यान, सभास्थळ बदलावे याबाबत मनसेला पोलिसांनी सुचवले होते. मात्र सभा नियोजित स्थळीच होईल असा पवित्रा मनसे नेत्यांनी घेतला आहे. स्व. बाळासाहेब यांच्या सभा याच मैदानावर झाल्या असल्याने या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सभास्थळात बदल करण्यास मनसे नेत्यांनी नकार दिला. तर औरंगाबादमध्ये 9 मेपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या आहेत अटी
– ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
– लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
– इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
– सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
– 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
– व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
– सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन टाळावे
– सभेच्या आधी व नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
– सभेत येणाऱ्या लोकांनी घोषणा देऊ नयेत
– सामाजिक सलोखा बिघडेल असे वर्तन करण्यात येऊ नये
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या