बीड : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला (Beed Rainfall) झोडपून काढले आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच लघु- मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो (Small-medium project overflow) झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी (Godavari River), सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा, कुंडलिका, मनकर्णिका सरस्वती यासह जवळपास सर्वच नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचे पाणी शेतात शिरुन शेत जमिनीचे मोठे नुकसान (Major damage to farm land) झाले आहे. मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी (6 people dead in beed) घेतला आहे.Also Read - Monsoon Update: राज्यात उद्यापासून पुढचे चार दिवस विजांच्या कडकाटासह मुसळधार पाऊस!

सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बीडमध्ये घर, शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे 20 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात या नैसर्गिक आपत्तीने सहा जणांचा बळी घेतला आहे. तर 29 पशुधनाची हानी झाली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात 4 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर (Cotton, soybeans, tur ) पीक हातातून गेले असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हाता तोंडाशी आलेले पिक वाहून गेल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला आहे. Also Read - Breaking News Live Updates: चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या, नाले, धरणं ओसंडून वाहत आहेत. या चार दिवसाच्या काळात वडवणी तालुक्यात बंधाऱ्यात वाहून जाऊन 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंगावर भिंत पडून बीडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच गेवराई तालुक्यात अंगावर भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. बीड शहरातील कपिलधार येथे पूराच्या पाण्यात वाहून जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मनुष्य हानीसोबत पशुहानी (Animal loss) देखील मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्याचे बैल, म्हैस, शेळ्या, वासरु, कोंबड्या वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याला आणखी फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे. Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा