मुंबई: राज्यातील अनुसूचित जातीतील (Scheduled Caste) विद्यार्थ्यांसाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Maharashtra Minister Dhananjay Munde) यांनी मोठी घोषणा केली आहे. 10 वीच्या परीक्षेत (10th Result Maharashtra Board) 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाखप्रमाणे एकूण 2 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं बार्टीमार्फत (BARTI-Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणं गरजेचं आहे.Also Read - 10th and 12th Results: दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडणार, जाणून घ्या काय आहे कारण...

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या 30 व्या नियामक मंडळाची 21 जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Also Read - Bhagwant Mann Cabinet : महिनाभरात हजारो तरुणांना मिळणार सरकारी नोकरी! भगवंत मान मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणं अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. Also Read - Breaking News Live Updates: आमदार नितेश राणे नरमले! अखेर सिंधुदुर्ग कोर्टात शरण

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.