मुंबई : गणपती विसर्जनादरम्यान (Ganesh Visarjan 2021) मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील वर्सोवा गावामध्ये गणपती विसर्जनादरम्यान (anant chaturdashi 2021) पाच मुलं समुद्रात बुडाली. यामधील दोन मुलांना वाचवण्यात यश आले. पण इतर तीन मुलं ही अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे वर्सोवा गावात (versova Village) एकच खळबळ उडाली आहे.Also Read - Sindhu Border Murder Case: सिंघू बॉर्डर तरुणाची हत्या प्रकरण, 4 जणांना पोलिसांनी केली अटक!

मुंबईतल्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर (versova beach) लाडक्या गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. बाप्पाला निरोप (bappa visarjan 2021) देण्यासाठी काही मुलं समुद्र किनाऱ्यावर आली होती. याच दरम्यान पाच मुलं समुद्रात बुडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन मुलांना वाचवण्यात यश आले. पण उर्वरित तीन मुलं अद्याप बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस (Police), पालिकेचे कर्मचारी (BMC Workers), अग्निशनम दलाचे कर्मचारी (Firefighters) आणि तटरक्षक दलाने (Coast Guard) घटनास्थळी धाव घेतल शोधकार्य सुरु केले. मुंबईमध्ये रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall in Mumbai) सुरु झाला आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे. Also Read - Mumbai Local Updates: यापुढे 18 वर्षांच्या आतील मुलांना रेल्वे प्रवास करता येणार, रेल्वे प्रशासनाकडून निर्णय जाहीर!

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलं गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर आली होती. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना ही मुलं खोल समुद्राच्या दिशेने गेली. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते पाचही जण बुडाले. मुलं बुडत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात येता त्यांनी तात्काळ त्यांचा शोध घेत दोघांना वाचवले. या दोन्ही मुलांना उपचारासाठी कपूर रुग्णालयात (Cooper Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत तीन जण अद्याप बेपत्ता आहे त्यांचा शोध सुरु आहे. Also Read - BIG NEWS: समीर वानखेडे यांची होणार चौकशी, मुंबई पोलिस पाठवणार समन्स!