Top Recommended Stories

Big News: कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले! मास्कपासूनही मुक्ती; मुख्यमंत्री म्हणाले, गुढीपाडव्यापासून...

राज्यातील जनतेला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तो म्हणजे, आज (गुरुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंध उठवण्यात आल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी केली आहे. त्याचबरोबर आता नागरिकांना मास्क (Corona Mask) पासूनही मुक्ती मिळाली आहे.

Updated: March 31, 2022 6:10 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Big News: कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले! मास्कपासूनही मुक्ती; मुख्यमंत्री म्हणाले, गुढीपाडव्यापासून...

Big News: राज्यातील जनतेला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तो म्हणजे, आज (गुरुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंध उठवण्यात आल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी केली आहे. त्याचबरोबर आता नागरिकांना मास्क (Corona Mask) पासूनही मुक्ती मिळाली आहे. मास्क ज्यांना वापरायचा असले त्यांनी वापरावा, त्याची सक्ती केली जाणार नसल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Also Read:

मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुढीपाडवा’ (Gudi Padwa) म्हणजे नववर्षाची (Marathi New Year 2022) सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या (Coronavirus) भयंकर विषाणुचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे जाहीर केले.

You may like to read

आरोग्याचे नियम पाळून काळजी घ्या…

कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.


दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलिस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.