Top Recommended Stories

Ajit Pawar's News: मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडला वाहतुकीचा नियम, भरला 27000 रुपये दंड

Ajit Pawar's News: कडक शिस्तीचे आणि नियमांचे पालन करणारे अशी जनमानसात ओळख असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Maharashtra Deputy Minister Ajit Pawar) यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. वाहतुकीचे नियम तोडल्याने अजित पवारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अजित पवार यांनी दंड म्हणून तब्बल 27000 हजार रुपये भरले आहेत.

Published: April 29, 2022 2:08 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Ajit Pawar's News: मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोडला वाहतुकीचा नियम, भरला 27000 रुपये दंड

Ajit Pawar’s News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Maharashtra Deputy Minister Ajit Pawar) यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार  (Ajit Pawar) यांच्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आली आहे. या कारवाईत वाहतूक विभागाने (Traffic Police) अजित पवारांकडून सुमारे 27000 रुपयांचा दंड आकारला आहे. अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांवर देखील वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

मिळालेली माहिती अशी, की वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे केवळ अजित पवारच नाहीत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil), राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Valse Patil), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharne) यांचा देखील समावेश आहे. या नेते मंडळीवर देखील वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

You may like to read

कोणी किती भरला दंड?

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक दंड अजित पवार यांनी भरला आहे. अजित पवारांनी 27000 हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर सगळ्यांना कायद्याचे पालन करा, असे आवाहन करणारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 5200 रुपयांचा दंड भरला आहे. दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या खालोखाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. चंद्रकांत पाटील यांना 14200 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नसल्याची माहिती देखील मिळाली आहे.

PUC च्या दरात 30 ते 35 रुपयांची वाढ

दुसरीकडे, वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. ती म्हणजे, वाहनांच्या PUC (प्रदूषण नियंत्रण) चाचणी दरात वाढ मोठी वाढ करण्यात आली आहे. PUC चाचणीचे दर 30 ते 35 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.


राज्या परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार, 27 एप्रिलपासूनचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. दुचाकीच्या PUC चाचणीसाठी आधी 35 रुपये होते. आता त्यासाठी 50 रुपये आकारण्यात येत आहेत. पेट्रोलवरील तीनचाकीसाठी आता 100 मोजावे लागत आहेत. आधी 70 रुपये आकारले जात होते. सीएनजी, एलपीजी चारचाकीसाठी आधी 90 रुपये आकारले जात होते. आता 125 रुपये आकारले जात आहेत. तर डिझेलवर चालणारे जड वाहनासांठी आता 150 रुपये आकारले जात आहेत. आधी 110 रुपये आकारले जात आहेत. परंतु या दरवाढीला ऑल महाराष्ट्र पीयूसी ओनर्स असोसिएशनचा विरोध असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी दिली आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>