मुंबई: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लागलीच आज (28 ऑक्टोबर 2021) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पोलिस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदांचा समावेश आहे.Also Read - Oil India Recruitment 2021 : ऑइल इंडियामध्ये नोकरीची सुवर्ण संधी, मिळेल तगडा पगार, जाणून घ्या पात्रता

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा (MPSC Exam) दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती आयोगानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. Also Read - ST Workers Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून होणार कठोर कारवाई, 74 हजार जण अजूनही संपात सहभागी

मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपासून सुरूवात होईल. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे. Also Read - Indian Air Force Recruitment 2021 : इंडियन एअर फोर्समध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक

किती आहे परीक्षा शुल्क-

– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 रुपये.
– मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क
– परीक्षा शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

शैक्षणिक पात्रता-

– मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक.
– पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील अर्ज दाखल करु शकतात.
– मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक.
– पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक.
– पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता येणे आवश्यक.