पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये (tarapur industrial estate) एका कंपनीमध्ये मोठा स्फोट (Blast in Company) झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.Also Read - Ulhasnagar Rape Case: धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर मामाने केला बलात्कार!

Also Read - Terror Module: दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला, नवरात्रीदरम्यान तेलाच्या टँकरचा करणार होते स्फोट!

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे- 1 मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये (Zakaria Limited Company) हा स्फोट झाला त्यानंतर कंपनीला भीषण आग (Fire in Comoany) लागली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या स्फोटाचा आवाज तीन ते चार किलोमीटर परिसरापर्यंत ऐकू आला. कंपनीला लागलेली आग खूप भीषण आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आली आहे पण तरीही आग धुमसत आहे. Also Read - Karnataka Accident: कर्नाटकमध्ये भरधाव जीपची लॉरीला धडक, अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीतील बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला मोठी आग लागली. ही घटना घडली त्यावेळी कंपनीत आठ कामगार काम करत होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एक जण बेपत्ता आहे त्याचा शोध सुरु आहे. जखमींना तात्काळ बोईसर (Boisar) येथील खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.