Top Recommended Stories

live

BMC Budget 2022 LIVE: मुंबई महापालिकेचा 45,949.21 कोटींची अर्थसंकल्प सादर

BMC Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर झाल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporations budget today) अर्थसंकल्प (BMC Budget) सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन (Online Budget) सादर केला जाणार आहे.

Updated: February 3, 2022 1:32 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

BMC Budget 2022
BMC Budget 2022

BMC Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर झाल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचा (Mumbai Municipal Corporations budget today) अर्थसंकल्प (BMC Budget) सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन (Online Budget) सादर केला जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election 2022) निमित्ताने नेमकं काय गिफ्ट मिळणार आहे याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणूक लक्षात घेता नवीन करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात मुंबईकरांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Also Read:

Live Updates

 • 1:30 PM IST
  अग्निशमन दलाच्या नवीन प्रकल्पासाठी 365 कोटींची तरतूद

  महापालिकेच्या मांड्याकरता 121 कोटींची तरतूद
  भायखळा राणी बागेच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणासाठी 115 कोटींची तरतूद
 • 1:02 PM IST
  2021-22च्या तुलनेत अर्थसंकल्पात 17.70 टक्क्यांनी वाढ

  बेस्ट उपक्रमासाठी 800 कोटींची तरतूद
  मागच्या वर्षी बस उपक्रमासाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आली होती
 • 12:59 PM IST
  मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ नाही

  मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला
  अर्थसंकल्पात कोणतीही थेट करवाढ नाही
  पायाभूत सुविधा आणि आरोग्यावर अर्थसंकल्पात भर
 • 12:56 PM IST
  मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावा लागणार

  मुंबईतील 3500 उपहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार
 • 12:55 PM IST
  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार

  अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर
  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात
  शिवयोग केंद्रासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद
  केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण ‘शिवयोग केंद्र’ असे करण्यात आले
 • 12:42 PM IST
  मुंबई महापालिकेचा 45,949.21 कोटींची अर्थसंकल्प सादर

  महापालिका आयुक्त इकबालसिंह चलह यांनी केला अर्थसंकल्प सादर
  45,949.21 कोटींची अर्थसंकल्प सादर
  तर 8.43 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर
  मागच्या वर्षी 39,038 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता
 • 11:17 AM IST
  शिक्षण समितीचा 3370 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

  मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर
  उपायुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला अर्थसंकल्प
  यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 3, 2022 10:14 AM IST

Updated Date: February 3, 2022 1:32 PM IST