Top Recommended Stories

BMC Election 2022: मुंबई महापालिकेकडून निवडणूक आयोगाकडे प्रभाग पुनर्रचना आराखडा सादर

राज्य निवडणूक आयोगाने या आराखड्यास मान्यता दिली तर मुंबई महापालिकेत नवीन नऊ प्रभागांची भर पडणार आहे. मुंबईतील प्रभागाची संख्या 326 झाल्याने निवडणुकीतील जागांचे समीकरण बदल्याची शक्यता आहे.

Published: January 21, 2022 7:47 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

BMC Election 2022: मुंबई महापालिकेकडून निवडणूक आयोगाकडे प्रभाग पुनर्रचना आराखडा सादर
महाराष्‍ट्र BMC ने जारी की अवैध स्‍कूलों की सूची

BMC Election 2022: राज्यातील प्रमुख महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेचा (BMC) कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. (Political Movements) सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation Election 2022) नवीन प्रभाग रचनेचा आराखडा शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) सादर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या आराखड्यास मान्यता दिली तर मुंबई महापालिकेत नवीन नऊ प्रभागांची भर पडणार आहे. मुंबईतील प्रभागाची संख्या 326 झाल्याने निवडणुकीतील जागांचे समीकरण (Political Equations) बदल्याची शक्यता आहे.

कोणत्या ठिकाणी वाढणार प्रभाग?

मुंबई शहर (Mumbai City), पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर या ठिकाणी समसमान तीन प्रभाग वाढणारा असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार शहर भागात लोअर परेळ, वरळी सारख्या नवीन बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वार्ड येण्याची शक्यता आहे. तर पूर्व उपनगरात मानखुर्द, संघर्ष नगर, माहूल या ठिकाणी नवे वार्ड येण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात प्रभाग वाढण्याची शक्यता आहे.
याबाबतचा प्रभाग पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील 2011 च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा 11 वर्षाच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या आणि वाढीव नवी बांधकामे, लोकसंख्येचा आधार घेऊन या प्रभाग पूनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

You may like to read

फेब्रुवारी 2022 मध्ये संपणार कार्यकाळ

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत असून त्याच वेळी निवडणूक होणे अपेक्षित आहे. परंतु सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेता निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेने (Shivsena) आपले वर्चस्व सिद्ध केले होते. यात 227 जागांपैकी 97 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या तर भाजपाला (BJP) 83 जागा मिळाल्या होत्या.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.