Corona Self Test: सावधान! घरीच कोरोना टेस्ट करताय? BMC ने आता दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबईसह राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु मुंबई महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

Updated: January 12, 2022 5:15 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Corona Self Test: सावधान! घरीच कोरोना टेस्ट करताय? BMC ने आता दिले महत्त्वाचे निर्देश

Corona Self Test Kit: देशभरात कोरोनासह ओमिक्रॉनच्या (Corona new Variant) संकटात वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1,94,720 नवे कोरोना रुग्ण (corona patient in india) आढळले असून 442 रुग्णांचा मृत्यू (Corona Death in India Today) झाला आहे. देशात 60,405 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत (Omicron patient in india) देखील झपाट्याने वाढ झाली आहे. ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 4,868 वर पोहोचली आहे.

Also Read:

मुंबईसह राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु मुंबई महापालिकेची (BMC) डोकेदुखी वाढली आहे. कोविड सेल्फ टेस्ट किटमुळे (Corona Self Test Kit) कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो, असे BMC ने म्हटले आहे. बहुतांश लोक कोविड सेल्फ टेस्ट किटच्या मदतीने घरीच कोविड टेस्ट करत आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यामागे हे देखील प्रमुख कारण असू शकते, अशी शंका देखील BMC ने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर BMC ने मेडिकल डिस्ट्रिब्युटर आणि मेडिकल चालकांना टेस्टिंग किट घेऊन जाणाऱ्यांची माहिती आणि पत्ता ठेवण्याचे आदेश दिले आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती मीडियाला दिली आहे.

संसर्गाचा धोका वाढण्याची आणखी शक्यता…

पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले. मुंबईसह उपनगरात कोविड सेल्फ टेस्ट किटची (Covid Self Test Kits) मागणी वाढली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येणारे बहुतांश नागरिक पॅथॉलॉजी लॅबमध्ये ने जाता घरीच कोरोना टेस्ट करत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा योग्य आकडा मिळण्यास मोठी अडचणी निर्माण झाली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो.

काय आहेत BMC चे निर्देश..

– कोविड सेल्फ टेस्ट किट घेऊन घरी कोरोना चाचणी करणाऱ्यांवर आता महापालिका लक्ष ठेवणार
– महापालिकेच्या वतीने आणि सरकारच्या वतीने आरटीपीसीआर टेस्ट निशुल्क
– मागच्या 15 दिवसांत अनेकजण घरी टेस्टिंग किट घेऊन जात असल्याचे आढळले
– मेडिकल डिस्ट्रीब्युटर आणि मेडिकल चालकांना टेस्टिंग किट घेऊन जाणाऱ्यांची माहिती आणि पत्ता ठेवण्याचे आदेश
– महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सूचना न देता कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांवर परस्पर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कारवाई सुरू
– लक्षणे असतानाही रूग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा
— BMC कडून लवकरच सेल्फ टेस्टबाबत गाईड लाईन जारी करण्यात येईल.
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा
– दररोज 60-70 हजार लोक कोरोना टेस्ट करत असल्याचा BMC चा दावा
– केवळ 7-8 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत आहे.
– सर्वाधिक 93 टक्के रुग्णसंख्या अपार्टमेंटमधील
– मुंबईत 90 टक्के लोकांनी घेतले कोरोनाचे दोन्ही डोस

किटमुळे अचूक निदानाची खात्री नाही…

कोरोना सेल्फ टेस्ट किटमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. कारण किटमुळे अचून निदानाची खात्री नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे सेल्फ टेस्टमुळे महापालिकेकडे नोंद होत नाही. कोरोना रुग्णाची ओळख लपून राहिल्याने कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो, अशी भीती देखील वर्तवण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 12, 2022 3:23 PM IST

Updated Date: January 12, 2022 5:15 PM IST