Top Recommended Stories

Bogus Covid 19 Certificate: सावधान! तुमच्याकडे असलेले कोरोना सर्टिफिकेट बनावट तर नाही ना...मोठे रॅकेट सक्रीय?

Bogus Covid 19 Certificate: सावधान! तुमच्याकडे असलेले कोरोना सर्टिफिकेट (Covid 19 certificate) बनावट तर नाही ना? कारण, महाराष्ट्रात कोरोना चाचणीचे बनावट प्रमाणपत्र (Bogus Covid 19 Certificate) देणारी टोळी (Racket) सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Updated: February 4, 2022 2:39 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Bogus Covid 19 Certificate: सावधान! तुमच्याकडे असलेले कोरोना सर्टिफिकेट बनावट तर नाही ना...मोठे रॅकेट सक्रीय?

Bogus Covid 19 Certificate: सावधान! तुमच्याकडे असलेले कोरोना सर्टिफिकेट (Covid 19 certificate) बनावट तर नाही ना? कारण, महाराष्ट्रात कोरोना चाचणीचे बनावट प्रमाणपत्र (Bogus Covid 19 Certificate) देणारी टोळी (Racket) सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) याबाबत अत्यंत गंभीर टिप्पणी देत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका कैद्याने सादर केलेल्या कोरोना चाचणी प्रमाणपत्रावरून बनावट कोरोना सर्टिफिकेट रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कैद्याने कोरोना सर्टिफिकेट महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon, Maharashtra) येथून मिळवले असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

Also Read:

एका खुनाच्या कैद्याने जामिनाची मुदत वाढवून मिळावी यासाठी गुजरात हायकोर्टात सादर केलेले कोरोनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरात हायकोर्टाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार पोलिस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी करून 28 फेब्रुवारीला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कैद्याने हे सर्टिफिकेट महाराष्ट्रातील जळगाव येथून मिळवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जळगावात कोरोनाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

You may like to read

नेमकं काय आहे प्रकरण?

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालय तथा रुग्णालयाच्या आवारात कोरोनाचे बनावट सर्टिफिकेट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. याबाबत नुकतीच एका सुरक्षारक्षकावर प्रशासनाने कारवाई केली आहे. अशातच या प्रकाराला दुजोरा देणारी घटना घडली समोर आली आहे. गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती सोनिया गोकणी आणि न्यायमूर्ती मोना भट्ट यांच्या न्यायपीठासमोर एका खुनाच्या कैद्याच्या जामिनाबाबत गुरुवारी सुनावणी झालीय 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याला 12 ऑक्टोबर रोजी आईवर उपचार करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता.

मुदत संपून देखील तुरुंगात हजर नाही

मंजूर झालेल्या रजेची मुदत संपून देखील हा कैदीत तुरुंगात हजर झाला नाही. तसेच तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला जामिनाला मुदत वाढ मिळण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. यासाठी त्याने जळगाव येथून मिळालेले कोविड पॉझिटिव्ह सर्टिफिकेट कोर्टात सादर केले. मात्र, कैद्याने सादर केलेल्या कोरोना सर्टिफिकेटवर कोर्टाने संशय व्यक्त केला आहे. कैद्याने सादर केलेल सर्टिफिकेट बनावट असल्याची गंभीर टिप्पणी कोर्टाने दिली आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

काय म्हणाले गुजरात हायकोर्ट?

गुजरात हायकोर्टाने या प्रकरणी गंभीर टिप्पणी केली आहे, न्यायमूर्ती म्हणाले की, सूरत तुरुंगातील कैद्याने महाराष्ट्रातील जळगाव येथून कोरोना संक्रमित असल्याचे प्रमाणपत्र मिळविले. महाराष्ट्रात एखादे व्यवस्थित नेटवर्क या मागे कार्यरत असल्याचा संशय येतो. अशा नेटवर्कला पकडण्यासाठी पोलिस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास करावा, जेणेकरून बनावट प्रमाणपत्राचे हे नेटवर्क पकडले जाईल. यापुढे बनावट सर्टिफिकेटच्या आधारे होणारे इतर गुन्हे तातडीने रोखले जाऊ शकतील. तपास अहवाल 28 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीला कोर्टात सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

सरकारी वकिलांनी नोंदवला आक्षेप…

खुनाच्या प्रकरणात शिक्षा झालेला कैदी सुनील उर्फ पहिलवान पाटील हा सूरत येथील तुरुंगात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याने जामिनाला मूदतवाढ मिळावी, यासाठी महाराष्ट्रातील जळगाव येथून कोरोना संक्रमित असल्याचे प्रमाणपत्र आणले होते. हे प्रमाणपत्र प्रथमदर्शी संशयास्पद असून हे प्रमाणपत्र बनावट असल्याची शक्यता आहे, असा आक्षेप सरकारी वकिलांनी घेतला. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, प्रवासासाठी बनावट RTPCR रिपोर्ट दिल्याप्रकरणी तीन ट्रॅव्हल्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना काळात प्रवास करताना चक्क प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यासाठी चक्क बनावट RTPCR रिपोर्ट देण्यात येत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 12:51 PM IST

Updated Date: February 4, 2022 2:39 PM IST