मुंबई: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case)अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) सुपुत्र आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. आर्यनला गुरूवारी देखील दिलासा मिळाला नाही. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आणखी पाच दिवस तुरुंगातच राहावं लागणार आहे. म्हणजेच आर्यनचा दसरा सण तुरुंगातच जाणार आहे.Also Read - Cruise Drugs Party Case: मुलाच्या सुटकेसाठी शाहरुखकडून जोरदार प्रयत्न सुरु, भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आर्यनची बाजू मांडणार!

आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही 20 तारखेलाच सुनावणी होणार आहे. आर्यनला जामीन (Bail) मिळावा यासाठी शाहरुख खानचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण कोर्टानं गुरूवारी त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी 5 दिवसांनी पुढे ढकलली आहे. Also Read - 'लोकांना खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे', NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याने पाठवली चिठ्ठी, Nawab Malik यांचा दावा

मुंबईत समुद्रात क्रुझवर ड्रग्स पार्टी करणाऱ्या आर्यन खानसह आठ जणांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानला सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात (Arthar Road Jail) आहे. Also Read - Mumbai Local Update: 28 ऑक्टोबरपासून मुंबईची लाईफलाईन पूर्ण क्षमतेने धावणार, मध्य-पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या!

आर्यन खानला आता इतर कैद्यांसोबत राहावं लागणार!

आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगातील क्वारंटाइन बराकमध्ये (Quarantine barrack) आहे. पण आता त्याचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या बराकमध्ये हलवण्यात येणार आहे. आर्यनला आता इतर कैद्यांसोबत राहावे लागणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे तुरुंगामध्ये योग्य ती काळजी घेतली जात आहे. नव्या कैद्यांना जेलमध्ये आणल्यानंतर त्यांना इतर कैद्यासोबत ठेवलं जात नाही. त्यांना सुरुवातीला क्वारंटाईन बराकमध्ये ठेवलं जातं. आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये आणल्यापासून तो क्वारंटाइन बराकमध्ये होता. पण आता त्याचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह (Corona Report Negative) आला आहे. त्यामुळे त्याला इतर कैद्यांसोबत दुसऱ्या बराकमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जेल प्रशासनाने दिली आहे.