मुंबई : मुंबईतील सीएसएमटी (CSMT railway staion), भायखळा (Byculla railway staion) आणि दादर रेल्वे स्थानकावर (dadar railway staion) बॉम्ब (bomb) ठेवण्यात आले असल्याच्या अफवेमुळे (bomb threat) एकच खळबळ उडाली होती. या निनावी फोनने (anonymous call) मुंबई पोलिसांची (Mumbai Police) झोप उडवून टाकली. मुंबईतल्या चार ठिकाण बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. या फोननंतर रेल्वे पोलिसांनी बॉम्ब स्कॉड (bomb squad ) आणि डॉग स्कॉडसोबत (dog squad ) संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर पालथा घालता. याठिकाणी त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले पण त्याठिकाणी कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही.Also Read - Raj Kundra ची ऑर्थर रोड जेलमधून सूटका, 119 Porn Videos सापडल्याचा क्राईम ब्रँचचा खुलासा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असे सांगून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला होता. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस (Mumbai police), जीआरपी (GRP), डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. या फोनमुळे मुंबई पोलिसांची झोप उडाली. या चारही ठिकाणी पोलिसांनी कसून शोध घेतला पण काहीच सापडे नाही. मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल करणाऱ्या या व्यक्तीचा शोध सुरु आहे. Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

बॉम्ब असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणी दाखल झाले. खूप वेळ त्यांनी चारही ठिकाणी शोधाशोध केली. पण कोणतीही स्फोटकं किंवा संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. रेल्वे पोलिसांना ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरवर पुन्हा फोन करण्यात आला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने माझ्याकडे जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली. आता मला डिस्टर्ब करुन नका, असे सांगितले आणि फोन स्विच ऑफ (Switch off) केला. त्याचा फोन बंद असल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण होत आहे. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश