Wardha Car Accident: कार नदीत कोसळली, भीषण अपघातात आमदार पुत्रासह मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू
वर्धा शहरापासून जवळच असलेल्या देवळी गावाजवळ कारचा भीषण (Car accident) अपघात झाला आहे. या अपघातात मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा (7 medical students Death on spot) जागेवरच मृत्यू झाला आहे.

Wardha car crash: वर्धा शहरापासून जवळच असलेल्या देवळी गावाजवळ कारचा भीषण (Car accident) अपघात झाला आहे. या अपघातात मेडिकल कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांचा (7 medical students Death on spot) जागेवरच मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतामध्ये भाजपचे आमदार विजय राहगंडाले ( BJP MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
Also Read:
मिळालेली माहिती अशी की, वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारात कार नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात सात तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. सर्वजण यवतमाळ येथून कारने वर्धा येथे जात होते. सगळे विद्यार्थी दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते.
अविष्कार रहांगडालेसह सातही जण वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेले होते. परत येताना मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास देवळी तालुक्यातील सेलसुरा येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. अपघात इतका भीषण आहे की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत सात तरुणांचा मृत्यू झाला होता. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.
मृत विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे…
अविष्कार रहांगडाले (भाजप आमदाराचा मुलगा), नीरज चौहान, नितीश सिंह, विवेक नंदन, प्रत्युष सिंह, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती
आमदार विजय राहगंडाले यांच्या मुलाचाही समावेश
या भीषण अपघातात मृत पावलेले सर्व विद्यार्थीसावंगी येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय राहगंडाले यांचे सुपुत्र अविष्कार रहांगडाले यांचाही मृत्यू झाल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता, की नदीवरुन पुलाचा संरक्षण कठडा तोडून गाडी थेट 40 फूट खाली कोसळली. सर्व मृत विद्यार्थी 25 ते 35 वयोगटातील आहेत. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
PM Modi announces Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives in the accident near Selsura, Maharashtra. Injured to be given Rs. 50,000: Prime Minister’s Office https://t.co/nFuhX61bHZ
— ANI (@ANI) January 25, 2022
मृतांचा कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत…
वर्ध्यात झालेल्या या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांचा कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची आणि जखमींसाठी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या