Bravery Award 2022: जळगावच्या 6 वर्षीय शिवांगी काळेचा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरव, आई आणि बहिणीचा वाचवला होता जीव
Bravery Award 2022: राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त शिवांगी हिची वीरता श्रेणीतून निवड करण्यात आली असून तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिवांगी ही गुलबक्षी व प्रसाद काळे यांची मोठी कन्या आहे. ती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे फर्स्ट स्टॅंडर्डमध्ये शिकत आहे.

Bravery Award 2022: अंगणात खेळत असताना विचेजा शॉक (Electric shock) लागलेल्या आईचा किंचाळण्याचा आवाज येतो, आईचा आवाज ऐकून 6 वर्षांची चिमुकली क्षणाचाही विलंब न करत घरात धावत येते, प्रसंगावधान व धाडस दाखवीत विद्युत प्रवाह बंद करते आणि आई व लहान बहिणीचे वाचवते. हे धाडस दाखवणारी जळगाव येथील चिमुकली शिवांगी काळेचा (Shivangi Kale) प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic day) राष्ट्रीय बालशक्ती शौर्य पुरस्कार (Bravery Award) देऊन गौरव करण्यात आला आहे. जाणून घेऊया कोण आहे ती ‘शौर्य कन्या’ (Shaurya Kanya)….
Also Read:
असे दाखवले शौर्य
जळगाव शहरातील (jalgaon city) कोल्हेनगरातील रहिवासी प्रसाद काळे हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची गृहिणी असलेली पत्नी गुलबक्षी यांनी गेल्या वर्षी 5 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता घरात आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बादलीत हिटर लावले होते. दरम्यान विजेचा प्रवाह सुरू असताना गुलबक्षी यांनी पाणी तापले किंवा नाही हे पाहण्यासाठी बादलीत हात टाकला. तेव्हा त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्या जोरात किंचाळल्या. हा आवाज ऐकून क्षणांचा विलंभ न करता शिवांगी घरात धावत आली आणि मागे आलेल्या लहान बहिणीला दूर केले. त्यानंतर प्लास्टिकचा स्टूल आणून तत्काळ बटण बंद केले आणि हिटरचा विजेचा प्रवाह बंद झाला. त्यामुळं गुलबक्षी यांचा जीव वाचला. असं धाडस दाखविणाऱ्या अवघ्या 6 वर्षाच्या ‘शिवांगी’चा राष्ट्रीय बाल पुरस्कार (National Bravery Award) देऊन गौरव करण्यात आला आहे.
शिवांगीला स्विमिंग आणि डान्सची आवड
राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त शिवांगी हिची वीरता श्रेणीतून निवड करण्यात आली असून तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिवांगी ही गुलबक्षी व प्रसाद काळे यांची मोठी कन्या आहे. ती जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे फर्स्ट स्टॅंडर्डमध्ये शिकत आहे. शिक्षणाच्या आवडीसह तिला स्विमिंग (swimming) आणि डान्सची (Dance) देखील आवड आहे. स्वच्छंद स्वभाव असलेली शिवांगी ही मनमिळावू स्वभावाची आहे.

Shivangi Kale
आई सेवानिवृत्त नेव्ही अधिकारी
शिवांगीचे वडील प्रसाद काळे हे जळगावातील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गुलबक्षी काळे या गेल्या दोन वर्षांपूर्वी नेव्हीमधून सेवानिवृत्त झाल्या आहेत. सध्या त्या गृहिणी म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. त्यांना सहा वर्षाची शिवांगी तर 3 वर्षांची इशान्वी या दोन मुली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
राष्ट्रीय बालपुरस्कार मिळालेल्या विजेत्यांचं मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. शिवांगीने वीरता श्रेणीतून पुरस्कार प्राप्त केला ही जळगावासाठी अभिमानाची बाब असल्याची, प्रतिक्रिया मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातून एकूण 6 जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून यात शिवांगी ही सर्वात लहान आहे. शिवांगीला कमी वयात इतका मोठा पुरस्कार मिळालयाने आम्हाला तिचा अभिमान वाटतो, अशी भावना तिची आई गुलबक्षी आणि वडील प्रसाद काळे यांनी व्यक्त केली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या