महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे. डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. तर रत्नागिरीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि जनतेच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. तर देशात डेल्टा प्लसचे 48 रुग्ण आढळले आहेत. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, 2 दिवसांत मत मांडले नाही तर ठरणार अपात्र!

Also Read - शिवसेना नेते अर्जुन Arjun Khotkar यांच्यावर ईडीची कारवाई, जालन्यातील कारखान्याची 200 एकर जमीन जप्त

Also Read - Maharashtra Crisis Live: राजकीय वातावरणामुळे शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील पोलिस हाय अलर्टवर

Live Updates

 • 10:15 PM IST

  शनिवारी दिवसभरात राज्यात 8 हजार 752 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 57 लाख 81 हजार 551 वर
  राज्याचा रिकव्हरी रेट एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 95.93 टक्के
  गेल्या 24 तासात राज्यात 9,812 नवीन रुग्णांची नोंदच; 179 मृत्यू
  राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.0 टक्क्यांवर
 • 6:50 PM IST
  “गर्दी करून ताकत दाखवतो तो नाही, समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारा खरा नेता”
  भाजपच्या चक्काजाम आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला निशाणा
  “संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता”
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र भडणवीस यांना टोला
  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राचा शुभारंभ
  मराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंचं कौतुक
 • 2:07 PM IST
  पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसीचं आरक्षण परत आणू शकतो : देवेंद्र फडणवीस
  “ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय सन्यास घेईन”
  नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
  राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
 • 12:22 PM IST
  ओबीसींच राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद
  ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपाचं आंदोलन सुरू
  सकाळपासूनच राज्यातल्या विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू
  मुंबईतल्या मुलुंड चेकनाक्याजवळ आशिष शेलारांच्या नेतृत्त्वात चक्काजाम
  “सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप”
  माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका
 • 10:22 AM IST
  अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ईडीने पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदेंना केली अटक

  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
  देशमुखांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक
  शुक्रवारी ईडीने देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील निवसास्थानी छापा टाकला
  ईडीने शुक्रवारी तब्बल 9 तास देशमुखांची केली चौकशी
 • 7:39 AM IST
  राज्यात 9,677 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 10,138 रुग्णांना डिस्चार्ज

  राज्यात 9,677 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
  10,138 रुग्ण बरे झाले असून त्यांना मिळाला डिस्चार्ज
  एका दिवसात 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू
  राज्यात एकूण 1,20,715 सक्रीय रुग्ण
  तर आतापर्यंत 57,72,799 रुग्णांची कोरोनावर मात