Health Department Recruitment Dates: तारीख ठरली! या दिवशी होणार आरोग्य विभाग भरती परीक्षा, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखां अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे

मुंबई : आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखां (Health department recruitment exams)अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला ‘क’ गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला ‘ड’ गट भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना 9 दिवसांपूर्वी हॉल तिकीट दिलं जाईल असे देखील आरोग्यमंत्र्यांची स्पष्ट केले आहे. (Breaking News Live Updates: Health department recruitment exams dates announced by Health Minister Rajesh Tope)
Also Read:
- Corona in Maharashtra: राज्यात पुन्हा लागू होऊ शकतो हा नियम, वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?
- Covid Restriction: राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत
- Corona Restrictions in Maharashtra: राज्यात मार्चपासून शिथिल होऊ शकतात कोरोना निर्बंध! काय म्हणाले राजेश टोपे?
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील 6205 पदांसाठी 25 आणि 26 सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार होती. परंतु ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे. या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असून आता गट – क संवर्गाची परीक्षा 24 ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.(Breaking News Live Updates: Health department recruitment exams dates announced by Health Minister Rajesh Tope)
सु्ट्टी असल्यामुळे रविवारी परीक्षा
रविवार असल्यामुळे शाळा उपलब्ध असतील, त्या अनुषंगाने या तारखा ठरवण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.तसेच बैठकीत अन्य बाबींवर देखील चर्चा झाली. त्यामध्ये डॅशबोर्ड केला पाहिजे, त्यावर सगळ्या परीक्षा केंद्रांची यादी दिली पाहिजे, विद्यार्थ्यांची यादी डॅशबोर्डवर दर्शवली गेली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, मोठ्या भरतीची परीक्षा असेल, तर त्यामध्ये अनेक वावड्या उठवल्या जातात किंवा काही जण चुकीचं काम करतात, त्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हावी अशा सूचनाही देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
गैरमार्गाचा वापर केल्यास कठोर कारवाई
परीक्षा पारदर्शी व्हाव्यात, यामध्ये कोणतीही गडबड होणार नाही याची काळजी आम्ही घेत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. काही जण चुकीचं काम करतात, काही गैरमार्गाचा वापर करतात, अशा स्वरुपाची कोणी मागणी केली तर त्या विद्यार्थ्याने किंवा पालकांनी संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. (Breaking News Live Updates: Health department recruitment exams dates announced by Health Minister Rajesh Tope)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या