राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. पण डेल्टा प्लस विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याने पुन्हा सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सतत चढ-उतार पाहायाला मिळत आहे. डेल्टा प्लस विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. अशामध्ये कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त भीषण नसणार असा निषअकर्ष आयसीएमआरने एका अभ्यासातून काढला आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील ताज्या अपडेटसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया…Also Read - New Covid Variant Detected : सावधान! देशात कोरोनाची चौथी लाट? नवा BA 2.75 व्हेरिएंट आढळला

Also Read - Maharashtra Government: 'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा'; उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान!

Also Read - 'हा वाद आता पुरे, लवकरात लवकर Metro 3 सुरु करा', Sumeet Raghavan चा नव्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा!

Live Updates

 • 9:49 PM IST

  चिंताजनक! राज्यात रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली

  गेल्या 24 तासात राज्यात 9 हजार 974 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
  कोल्हापुरात सर्वांधिक 1525 रुग्ण, धुळ्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही
  राज्यात 57,90,113 रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यावर
  राज्यात रविवारी दिवसभरात 143 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, राज्याचा मृत्यूदर 2 टक्के
  राज्यभरात सध्या 1 लाख 22 हजार 252 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत

 • 9:48 PM IST

 • 9:48 PM IST

 • 7:17 PM IST

 • 6:54 PM IST
  “ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप”
  “आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या फडणवीसांवर जनतेचा विश्वास बसणार नाही”
  काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीका


 • 1:49 PM IST
  इगतपूरीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा
  फिल्म इंडस्ट्रीतील 4 महिलांचा समावेश
  ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची सुरू होती पार्टी
  नको त्या अवस्थेत आढळून आले
  नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई
 • 1:11 PM IST
  पीएम मोदींनी मन की बातमधून साधला देशवासीयांशी संवाद
  टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने धावपटू मिल्खा सिंगच्या आठवणींना दिला उजाळा
  जगभरात ते महान धावपटू म्हणून ओळले जातात त्यांना कोणीच विसरू शकत नाही
  मिल्खा सिंग यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली
  साताऱ्याचा तिरंदाजी खेळाडू प्रवीण जाधवचं मोदींनी केलं कौतुक
  प्रवीण जाधवची टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाला सहभागी
  ऑलिम्पिकला जाणा-या खेळाडूंवर दडपण नको, त्यांना प्रोत्साहन द्या
  1 जुलै नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा करणार
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा
  लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नका
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आवाहन
 • 11:21 AM IST
  अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखांची निर्घृण हत्या
  डोळ्यात मिरचीपूड टाकून डोक्यावर धारदार शस्त्रांनी केले वार
  शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील यांची हत्या
  याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना केली अटक
 • 10:15 AM IST
  जम्मू विमातळावर मोठा स्फोट
  रविवारी सकाळी तांत्रिक विभागात झाला स्फोट
  स्फोटात वायुदलाचे दोन कर्मचारी जखमी
  भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला स्फोट
  फॉरेन्सिक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल