देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. देशात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागानं मुंबई आणि ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणात 13 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसह देश-विदेशातील ताज्या घडामोडींवर एक नजर टाकूया… Also Read - Breaking News Live Updates: देशात कोरोना रुग्णात घट, 24 तासांत आढळले 62,208 नवीन रुग्ण

Also Read - Mumbai Local Train Update: मुंबईत सर्वसामांन्यांसाठी लोकल कधी सुरू होणार? उद्या निर्णय अपेक्षित
Also Read - Breaking News Live Updates: चिंताजनक! राज्यात पुन्हा मृत्यूंची संख्या वाढली; दिवसभरात 388 जणांचे बळी!

Live Updates

 • 8:29 PM IST
  कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळली
  गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
  मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात कारवरच दरड कोसळली
  भले मोठे दगड कोसळल्यामुळे कारचा चक्काचूर झाला
  सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाह .
  दरड कोसळल्यानंतर माळशेज घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे
 • 5:27 PM IST
  – पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची स्वप्न उधळून लावल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा आणखी एक धक्का
  – भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची पक्षाला सोडचिठ्ठी
  – मुकुल रॉय यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजिव शुभ्रांशु रॉय देखील तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर

  – भाजपचे 33 आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू


 • 3:01 PM IST
  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोला अपघात, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोला अपघात
  रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ झाला अपघात
  आयशर टेम्पोला अपघात होऊन एकाचा मृत्यू
  टेम्पो चालकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
  टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने झाला अपघात
 • 12:47 PM IST
  प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला
  सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये बैठक सुरु
  भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  ममता बॅनर्जी यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा
 • 11:52 AM IST
  कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नाही, रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद –
  कोरोनामुळे पायी वारीला परवानगी नाही
  वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची परवानगी नाही
  विठ्ठल मंदिरात भाविकांना परवानगी नाही
  रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी
  रिंगण आणि रथोत्सवाला 15 वारकऱ्यांनाच परवानगी
  इतर वारकऱ्यांना सहभागी होण्यास परवानगी नाही
  वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणार
  १० मानाच्या पालख्या २० बसमधून पंढरपूरात पोहचतील
  ८ पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यांना १० बसची सोय
  देहू आळंदी प्रस्थान सोहळ्याला १०० वारकऱ्यांना परवानगी
 • 9:19 AM IST
  ठाण्यात मोबाईल चोरामुळे तरुणीचा मृत्यू
  मोबाईल चोराला प्रतिकार करताना रिक्षातून पडली तरुणी
  गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू
  नौपाडा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
  पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
 • 9:15 AM IST
  पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग
  मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना
  सुदैवाने आगीत जिवीतहानी नाही
  ब्रिटिश कालीन आहे महात्मा फुले मंडई
  आगीचे नेमके कारण अस्पष्ट
 • 8:49 AM IST
  मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात
  पुढील तीन तास मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
  मुंबईत संध्याकाळनंतर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज
  काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात