New Restrictions: मुंबईसह राज्यात अत्यावश्यक नसलेली दुकाने बंद ठेवावी लागणार, नवे आदेश लागू
मुंबईसह राज्यात कोरोनासह त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

New Restrictions in Mumbai and Maharashtra: मुंबईसह राज्यात कोरोनासह त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत (Omicron Variant) झपाट्याने वाढ होत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus Cases) नवे रेकॉर्ड बनवत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. सरकारतर्फे सोमवारपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत अंशत: सुधारणा करण्यात आली आहे. कोरोनाचा (Covid 19) वाढता धोका पाहाता आता मुंबईसह राज्यात (New Restrictions in Mumbai and Maharashtra) अत्यावश्यक नसलेली दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याचे नव्या आदेशात म्हटले आहे. नवे आदेश लागू करण्यात आले आहेत.
Also Read:
- Maharashtra Corona Update: चिंता वाढली! राज्यात 4004 नवीन रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
- Mumbai Corona updates: चिंता वाढली! ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव, 4 रुग्ण आढळले
- Maharashtra Corona Update: नागरिकांनो काळजी घ्या, राज्यात आज आढळले 1036 कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत सर्वाधिक रुग्ण
मुंबईसह राज्यात अत्यावश्यक नसलेली दुकाने रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी ब्युटी पार्लर आणि जिम 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील, असा निर्णय घेतला होता. त्यात आता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुढील आदेश मिळेपर्यंत दुकानांबाबत घेतलेल्या निर्णय अंमलात राहील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी….
– राज्य सरकारने राज्यात सोमवारपासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी केली आहे.
– त्यानुसार रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत राज्यात संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असणार आहे.
– कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येईल.
– परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणं बंधनकारक असणार आहेत.
काय आहेत सरकारचे नवे नियम? (Maharashtra Corona Guidelines)
> रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू
> लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 लोक
> अंत्यसंस्कारात जास्तीत जास्त 20 लोक
> सामाजिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रमात जास्तीत जास्त 50 लोक
> सार्वजनिक मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद
> मनोरंजन पार्क, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय बंद
> हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने उघडतील – रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद
> शाळा-कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, कोचिंग क्लासेस बंद
> खाजगी कार्यालयात 50 % कर्मचाऱ्यांची उपस्थिती
> लेखी परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात अभ्यागतांना परवानगी नाही.
> सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना परवानगी नाही
> स्थानिक खेळ आयोजित करण्यावर बंदी
> 50 % क्षमतेसह शॉपिंग मॉल सुरू राहणार
> 50% क्षमतेसह रेस्टॉरंट-हॉटेल सुरु ठेवण्यास मुभा
> 50 % क्षमतेसह थिएटर सुरू राहणार
> डोमेस्टिक ट्रॅव्हल- दोन्ही डोस घेतलेल्यांना किंवा 72 तासांच्या आत आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल असलेल्यांना परवानगी.
> सार्वजनिक वाहतुकीमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी आहे
> दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या