Top Recommended Stories

Building collapsed at Kalyan: मुंबईतील कुर्ल्यानंतर कल्याणमध्ये कोसळली इमारत; एकाचा मृत्यू, दोघे सुखरुप

Building collapsed at Kalyan: मुंबईतील कुर्ला (पूर्व) (kurla building collapsed)पाठोपाठ कल्याणमधील रामबाग भागात (Kalyan Rambaug) एक घर कोसळले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Published: June 29, 2022 11:22 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Building collapsed at Kalyan: मुंबईतील कुर्ल्यानंतर कल्याणमध्ये कोसळली इमारत; एकाचा मृत्यू, दोघे सुखरुप

Building collapsed at Kalyan: मुंबईतील कुर्ला (पूर्व) भागात (kurla building collapsed) इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील रहिवासी (Building collapsed at Kalyan) इमारत कोसळली आहे. कल्याण रामबाग परिसरात (Kalyan Rambaug) बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले असून दोन जणांना सुखरूप बाहेर काढले.

मिळालेली माहिती अशी, की रामबाग परिसरात बुधवारी सकाळी रहिवासी चाळ टाईप घर कोसळले. या घरात एक कुटुंब राहत होतं. ढिगाऱ्या उपसण्याचे काम सुरू असून दोन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या दुर्घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सूर्यभान काकडे असे मृत व्यक्तीचे नाव आहेय तर उषा काकडे यांच्यावर कल्याण येथील रुख्मिणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. इतर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

You may like to read


दरम्यान, सोमवारी कुर्ला (पूर्व) भागातील नाईकनगर परिसरात चार मजली इमारत कोसळली होती. आतापर्यंत या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमी झाले आहेत.

चार जणांविरोधात गुन्हा दाखल…

कुर्ला (पूर्व) भागातील नाईकनगर परिसरात घडलेल्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. अग्मिशमन दलाच्या जवानांना 15 जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

देव तारी त्याला कोण मारी!

मुंबईतल्या कुर्ला येथील नाईक नगरातील चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक कुटुंब आश्चर्यकारक बचावल्याची देखील माहिती समोर आली आहेच सध्या या लोकांवर उपचार सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारतमध्ये बडीया कुटुंब राहात होते. ते ढिगाऱ्याखाली दाबले गेले. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य करून ढिगाऱ्याखालून त्यांना जिवंत बाहेर काढले. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी प्रीत बडीया या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर प्रीतची आई देवकी आणि वडिलांना देखील सुखरुप बाहेर काढल्यात आले. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय आला आहे.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>