Top Recommended Stories

Buldhana Suicide News : पती घ्यायचा चारित्र्यावर संशय, पत्नीची दोन चिमुकल्यांसह धरणात उडी

Buldhana Suicide News : बुलढाणा तालुक्यातील करडी येथील विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह धरणात उडी घेत आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Updated: July 29, 2022 12:44 PM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

पती घ्यायच्या चारित्र्यावर संशय, मातेची दोन चिमुकल्यांसह धरणात उडी
पती घ्यायच्या चारित्र्यावर संशय, मातेची दोन चिमुकल्यांसह धरणात उडी

Buldhana Suicide News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका 30 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. तिने दोन लहान मुलांसह करडी धरणाच्या (Kardi Dam) पाण्यात उडी घेतली. ही महिला धाडजवळच्या करडीमध्ये राहत होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. चिमुकल्यांसह मातेने आपले जीवन संपवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरिता ज्ञानेश्वर पैठणे आहे. आत्महत्येनंतर (Suicide)या महिलेचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. यानंतर ही घटना उघडकीस आली. आता तिच्या दोन चिमुकल्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मृत महिलेचा भाऊ शरद कौतिकराव दामोदर याने धाड पोलिसांकडे तक्रार केली आहे.

You may like to read

भावाला केला होता अखेरचा मॅसेज

या महिलेने भावाला मृत्यू पूर्वी मॅसेज केल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामध्ये ‘गुडबाय आम्ही जग सोडून जात आहोत, कपाटातील रजिस्टर पोलीस काकांना द्यावे’ असा मॅसेज करण्यात आला होता. मॅसेज पाहिल्यानंतर भावाने महिलेला फोन केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. यावेळी पती ज्ञानेश्वर पैठणे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, सरिता या सकाळीच मुलांसह घर सोडून गेल्या आहेत. यानंतर सरिता यांच्या भावाने शोधाशोध सुरु केली. नातेवाईकांना विचारणा केली मात्र कुठेही शोध लागला नाही. यानंतर महिलेचा मृतदेह हा धरणात तरंगताना दिसला.

चारित्र्यावर संशय घ्यायचा पती

या प्रकरणी भावाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरिता यांचा पती त्यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता आणि तिला मारहाण करायचा. तसेच तिची सासू आणि नणंद देखील सरिताचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होत्या. या त्रासाला कंटाळूनच या महिलेने दोन्ही मुलांसह आत्महत्येचे पाऊल उचलले. या तक्रारीनंतर धाड पोलिसांनी सरिताचा पती, सासू, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पतीला अटक करण्यात आली आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>