
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Case Registered Against Sanjay Raut : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात शनिवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोनवरून महिलेला धमकी दिल्या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात (Vakola police station) हा गुन्हा नोंदवला गेला आहे. राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) वाकोला पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. अखेर संध्याकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio clip)होत आहे. यात फोन दोन व्यक्ती बोलताना ऐकू येत आहेत. यातील एक व्यक्ती महिला आहे तर दुसरी पुरुष आहे. ऑडिओक्लिपमध्ये पुरुष व्यक्ती एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना ऐकू येते. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात आपली भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. “ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत शिवीगाळ आणि धमकी देताना ऐकू येते. राऊतांनी प्रसारमाध्यमांसमोर मलाही अनेकदा शिवीगाळ केली आहे. त्यामुळे मला काळजी वाटते” असे किरीट सोमय्या म्हणाले. ते म्हणाले की, स्वप्ना पाटकर या महिलेच्या सुरक्षेसाठी मी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. या महिलेला काही झालं तर त्याला जबाबदार पोलीस असतील. पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार आणि स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा देणार असं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या