मुंबई : हिंदी चित्रपटात (Hindi Movie) काम देतो असे सांगून एका मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी (Casting Cauch) करणाऱ्या प्रोड्युसरसह उत्तर प्रदेशच्या चौघांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. आठ ते नऊ वेळा लोकेशन बदलणाऱ्या या चौघांचा पाठलाग करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी (MNS Activist) त्यांना पकडले. ठाण्यातील घोडबंदर (Thane Ghodbandar) येथे या चौघांनाही त्यांनी धू धू धुतले. त्यानंतर त्यांनी या चौघांनाही पोलिसांच्या (Thane Police) ताब्यात दिले. हिंदी चित्रपटात काम देवू पण त्यासाठी एक रात्र आमच्यासोबत घालवावी लागेल असे या तरुणीला सांगण्यात आले होते. तिने याबाबतची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्याला दिली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.Also Read - Viral Video: तुम्ही सुद्धा नाश्त्याला टोस्ट खाताय?, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खाणं बंद कराल!

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Chitrapat Sena president Ameya Khopkar) यांनी या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट (Facebook post) करत घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती दिली. अमेय खोपकर यांनी सांगितले की, ‘मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला आणि सांगितले की एका कास्टिंग डायरेक्टरने (Casting Director) मला फोन केला होता. तुला एका हिंदी चित्रपटात कास्ट केले आहे. पण जर तुला लीड रोल (Lead Roll) हवा असेल तर उद्या प्रोड्युसर लखनऊ येथून मुंबईत येणार आहेत. त्यांना तुला खूश करावे लागेल असे सांगितले.’ Also Read - Riteish Dekhmukh Video: रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ केला शेअर, म्हणाला- ‘माझी पत्नी मला देव समजते पण जेव्हा…’

Also Read - Ruchira Jadhav in Saree : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील 'माया'चा जलवा; साडीतील फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

‘त्या मुलीने हिंमत दाखवून ही गोष्ट कुटुंबीयांच्या कानावर घातली. तिच्या कुटुंबीयांना तात्काळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मला याबाबत माहिती मिळाली. मी ताबडतोब त्यांना ट्रॅप करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फार्म हाऊसवर (Farm House) ही मुलगी गेली. त्यावेळी तिच्यासोबत मनसेचे पदाधिकारी होते. यावेळी चारही आरोपींना मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.’, अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली.

दरम्यान, या चार आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हे चौघेही लखनऊ (Lucknow) येथून आले होते. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव असे या आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपींची धुलाई केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियाव (Social Media) तुफान व्हायरल (Video Viral) होत आहेत. या घटनेचा पर्दाफास केल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.