Top Recommended Stories

Central Railways Mega Block: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 5 तासांचा मेगाब्लॉक, या रेल्वेगाड्या रद्द!

Central Railways Mega Block : मुंबकरांनी मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक जरुर पाहा नाही तर तुम्हाला प्रवासाचा त्रास होईल.

Updated: January 30, 2022 8:29 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

मेगाब्लॉक
मेगाब्लॉक

Central Railways Mega Block : मध्य रेल्वेकडून (Central Railway) 30 जानेवारी म्हणजे आज पुन्हा एकदा मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून आज विविध कामांसाठी हा मेगा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार (CSMT-Vidyavihar) अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी (Panvel- Vashi) दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक तब्बल 5 तासांचा असणार आहे. त्यामुळे मुंबकरांनी (Mumbaikar) मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक (Local Timtable) जरुर पाहा नाही तर तुम्हाला प्रवासाचा त्रास होईल.

Also Read:

You may like to read

हा मेगाब्लॉक पाच तासांसाठी सुरु राहील. मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळी 10.55 वाजेपासून दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. मेगा ब्लॉकदरम्यान या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. मेगा ब्लॉकदरम्यान बेलापूर-खारकोपर दरम्यानची सेवा सुरु राहणार आहे. तसेच कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कार्यान्वित केला जाईल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय ट्रेन वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील. तर, बेलापूर- खारकोपर या स्थानकांदरम्यानची सेवा सुरु राहणार आहे. तर, नेरुळ-खारकोपर सेवा रद्द करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 30, 2022 8:25 AM IST

Updated Date: January 30, 2022 8:29 AM IST