Central Railways Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या.. मुंबईत 36 तासांचा मेगा ब्लॉक, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा!

मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Published: January 7, 2022 5:16 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

मेगाब्लॉक
मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे (Central Railways) उद्या 8 जानेवारी दुपारी 2 वाजेपासून तब्बल 36 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेत आहे. ठाणे आणि दिवा धिम्या मार्गांवर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेच्या पायाभूत सुविधांसाठी 10 जानेवारीला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक (Infrastructure Block) घेण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. शक्यतो बसने प्रवास करा अन्यथा तुमचे मेगाहाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Also Read:

ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या अवघ्या 9.5 किलोमीटर पट्ट्यांचे काम गेल्या दशकापासून रखडले होते. अखेर हे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. सध्या दिव्याजवळ उत्तरेच्या क्रॉसओव्हर रुळांच्या जोडणीचे काम सुरू आहे. हे काम दोन दिवस-रात्र चालणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने 36 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. यादरम्यान मध्य रेल्वे सेवा आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे.

या मेगाब्लॉक दरम्यान ठाणे-कळवादरम्यान नवी रुळ टाकण्यात आले आहेत. त्याचे कट आणि जोडण्याचे काम चालणार आहे. रुळ कापून तो सध्याच्या डाऊन-अप धीम्या मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, ठाणे आणि कळव्यातील यार्ड रीमॉडेलिंग आणि इंटरलॉकिंग व्यवस्थेतील बदल क्रॉसओव्हर, टर्न आऊट, डिरेलिंग स्विच समाविष्ट करून कार्यान्वित केले जातील. अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल आणि दूरसंचार कामांसाठी, 7 टॉवर वॅगन, 3 युनिमॅट/ड्युओमॅटिक मशीन, 2 डिझेल मल्टी लोको, एक ब्लास्ट रॅक, 1 डीबीकेण आदी उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे.


शनिवार, 8 जानेवारीला दुपारी 1 वाजेपासून कल्याणहून सीएसटीकडे धावणाऱ्या स्लो/फास्ट लोकल माटूंगापर्यंत अप फास्ट मार्गिकेवरून धावतील. या दरम्यान, ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहुर, कंजुरमार्ग आणि विद्यानगर स्टेशनवर कोणतीही लोकल ट्रेनला थांबा नसेल. कामपूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 10 जानेवारीला मध्यरात्री 2 वाजेनंतर सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 5:16 PM IST