Top Recommended Stories

CET Exam 2022: उच्च व तंत्रशिक्षण आणि कलाशिक्षण विभागच्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर!

CET Exam 2022: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. येत्या 3 जून ते 28 जून या कालावधीमध्ये सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.

Updated: March 27, 2022 12:37 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Best Career Option,Vocaional Courses,Vocational Course, Vocational course after 12th Class, Vocational course after 10th Class,Traditional Course, Sarkari Result, Career News, Sarkari Naukri 2022, Latest Jobs, Top Courses

CET Exam 2022: उच्च व तंत्रशिक्षण (higher and technical education) आणि कलाशिक्षण (arts education) विभागाच्या सीईटी परीक्षेची (CET Exam 2022) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि कलाशिक्षण विभागाच्या सीईटीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. येत्या 3 जून ते 28 जून या कालावधीमध्ये सीईटीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.

Also Read:

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 03 जून ते 10 जून 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 11 जून ते 28 जून 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. तर कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.’ त्यांनी आणखी एक ट्वीट करत ‘अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.’, असे सांगितले आहे.

You may like to read

सध्या सीईटी सेलकडून या परीक्षासाठी नोंदणी सुरू आहे. तीन्ही विभागांचे मिळून आतापर्यंत एकूण 4 लाख 58 हजार 721 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर यापैकी 3 लाख 70 हजार 304 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. उर्वरीत 88 हजार विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये. दरम्यान अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याचे निरासरन सीईटी सेलकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचा वेग मंदावला असला तरी कोरोना पूर्णपणे गेला नाही. त्यामुळे या सर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.