Top Recommended Stories

CET Exam 2022: एमएचटी-सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, 11 जूनपासून सुरु होणार परीक्षा!

CET Exam 2022: शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Published: March 26, 2022 11:21 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

CET Exam 2022
CET Exam 2022

CET Exam 2022 : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची (CET Exam 2022) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी (Academic year 2022-23) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक (Possible schedule of CET exam) जाहीर करण्यात आले आहे. 19 मार्च म्हणजे आज 11 जूनपासून या एमएचटी-सीईटी परीक्षेला सुरुवात होणार आहे.

Also Read:

कोरोनामुळे (Corona) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे बारा वाजले आहेत. अशामध्ये या कोरोनामुळे (Corona Virus) शैक्षणिक वेळापत्रक पूर्णत: कोलमडले होते. मागच्या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Corona) प्रक्रिया ठप्प झाली होती. आता कोरोनाचा वेग मंदावला आहे. सर्वकाही सुरळीत झाले आहे. त्यामुळे शाळा (School), कॉलेज (College) सुरु झाले आहेत. आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा होऊ लागल्या आहेत. आता सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षा जून महिन्यामध्ये होणार आहेत.

You may like to read

सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी रात्री संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. यावर्षी फेब्रुवारीपासून सीईटीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सविस्तर सीईटी परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाईटवर पाहता येईल. सीईटीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे हे खालीलप्रमाणे…

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) – 11 ते 16 जून 2022

– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) – 17 ते 23 जून 2022

– व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) – 24 ते 26 जून 2022

– संगणकशास्त्र (एमसीए) – 27 जून 2022

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: March 26, 2022 11:21 AM IST