अमरावती : पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी पर्यटन ठिकाणी मोठी गर्दी होत असते. चिखलदरा (Chikhaldara)असंच एक पर्यटन स्थळ आहे ज्याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक (Tourists) मोठी गर्दी करत असतात. या ठिकाणी आलेल्या तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला येथून आलेल्या तीन तरुणांचा जत्राडोहच्या डोहात बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.Also Read - Terror Module Busted: मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसचा हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन, चौकशीतून माहिती उघड!

शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (26 वर्षे), शेख आजीम शेख सकुर (27 वर्षे), अकोट फैल अशी मृतांची नावं आहेत. यामधील दोघे जण मित्र आहेत. हे दोघं आपल्या 9 मित्रांसह चिखलदरा येथे फिरण्यासाठी आले होते. चिखलदरा येथे त्यांनी वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट दिली. त्यानंतर ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील (Melghat Tiger Project) मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या जत्राडोह पाईंट येथे आले. जत्राडोह पाईंट येथे कोसळणाऱ्या धबधब्याखाली जाण्यास सक्त मनाई असताना सुध्दा ते याठिकाणी गेले. याठिकाणी आंघोळ करत असताना दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते खोल पाण्यामध्ये बुडाले. Also Read - Terror Module: मुंबईच्या जोगेश्वरीमधून सातवा संशयित दशतवादी ताब्यात, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

तर याच ठिकाणी आणखी एका पर्यटकाचा नदीच्या (River) डोहात बुडून मृत्यू झाला आहे. चिखलदरा पोलिस स्टेशनच्या (Chikhaldara Police Station) अंतर्गत येणाऱ्या पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीरबाबा नदीच्या डोहात बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हरीश काळमेघ असं या तरुणाचे नाव आहे. तो चौसाळ तालुका अंजनगाव येथील आहे. त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास चिखलदरा पोलिसांकडून सुरु आहे. Also Read - Rajasthan Rape Case: मन सुन्न करणारी घटना! 19 वर्षांच्या तरुणाने आजीची हत्या करुन मृतदेहावर केला बलात्कार!