Top Recommended Stories

Corona Vaccination : 15 ते 18 वयोगटातील मुलांना आता शाळेमध्येच मिळणार कोरोनाची लस!

Corona Vaccination : मुलांच्या लसीकरणाबाबत संभ्रम बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

Updated: January 21, 2022 8:49 AM IST

By Priya More | Edited by Priya More

Corona Vaccination
Corona Vaccination

Corona Vaccination : राज्यावर कोरोनाचे (Corona Virus) संकट असून कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने (Maharashtra Government) लसीकरण मोहीमेवर (Corona Vaccination) भर दिला आहे. अशामध्ये सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु (School Reopen in Maharashtra) करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण (Corona Vaccination For Childrens) मोहिम राबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मुलांच्या लसीकरणाबाबत संभ्रम बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

Also Read:

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रीमंडळाच्या (Maharashtra Cabinet) बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर (Vaccination) जोर दिला गेला पाहिजे यावर बैठकीत भर देण्यात आला. आजही लसीचा पहिला डोज आणि दुसरा डोज यामध्ये राज्यातील काही जिल्हे मागे पडले आहेत. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे अशी चर्चा बैठकीत झाली.’

You may like to read

’24 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्ह सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (District Collector), पालकमंत्री (Guardian Minister), मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) आणि शिक्षणाधिकारी (Education Officer) यांच्या सल्ल्याने कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या शाळा सुरू करायच्या हा निर्णय त्यांनी द्यावा. पण बऱ्यापैकी शाळा सुरू कराव्यात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच, 15 ते 18 वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचे शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी अशी चर्चाही बैठकीत झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

’15 ते 18 वयोगटातील 50 टक्के मुलांचं लसीकरण झाले आहे. शाळा सुरू व्हाव्यात. लहान मुलांच्या शिक्षणावर तसेच मनोविकासावर कुठल्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही, या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला टास्क फोर्सने (Task Force) देखील सहमती दिली आहे. तसंच, लसीकरणाबद्दल पालकांमध्ये संभ्रम असण्याचे कोणतेही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे लहान मुलांचेही लसीकरण सुरू झालेले आहे. आपल्याकडे सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलाचेच लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचे कोणतेही कारण नाही.’, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 21, 2022 8:48 AM IST

Updated Date: January 21, 2022 8:49 AM IST