Top Recommended Stories

Shivsena Protest: नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी केला लाठीचार्ज!

नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला.

Updated: August 24, 2021 1:28 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Shivsena Protest
Shivsena Protest

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (CM Uddhav Tackeray) वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्याचसोबत शिवसेना कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन (Shivsena Protest) करण्यास देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे (Yuvasena) जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर (narayan ranes residence) राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. नारायण राणे समर्थकांनी शिवसैनिकांनी लावलेले पोस्टर्स फाडले. एवढं नाही तर दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.

Also Read:

You may like to read

युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक आमने-सामने आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. यानंतर पोलिसांनी (Mumbai Police) जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या बंगल्याजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

सोमवारी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात रायगड (Raigad) येथे वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल (Independence Day 2021) बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणे यांनी ‘मी असतो तर कानाखाली लगावली असती’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिक (Nashik) येथे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्य संपर्क (BJP Head office) कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली. नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी नाशिक, पुणे आणि महाडमध्ये (Nashik, Pune, Mahad)त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक (Nashik Police) आणि पुणे पोलिसांचे (Pune Police) पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूनला रवाना झाले आहे. सध्या नारायण राणे चिपळूनमध्ये असून याठिकाणावरुन त्याची जनआशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 24, 2021 1:27 PM IST

Updated Date: August 24, 2021 1:28 PM IST