Top Recommended Stories

College Kadhi Suru Honar: राज्यात 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार, पण...

College Kadhi Suru Honar: कोरोना व्हायरस (Corona In Maharashtra)आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant)प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरात शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठ पुन्हा सुरू होणार आहेत.

Updated: January 26, 2022 9:10 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

College Kadhi Suru Honar: राज्यात 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार, पण...
Russia started its military offensive against Ukraine on February 24, which continues till date.

College Kadhi Suru Honar: कोरोना व्हायरस (Corona In Maharashtra)आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरात शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठ पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यात 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये (College Starts On February 1 in Maharashtra) सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारकडून मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Higher And Technical Education Minister Uday Samant) यांनी दिली आहे. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक (Corona Vaccine) लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Also Read:

राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवे रुग्ण देखील कमी आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील महाविद्यालये येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, शाळांप्रमाणेच महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याचे अंतिम अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आले आहेत.

You may like to read

कोरोना परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या…

राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परंतु कोरोना परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या, असे देखील निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

15 फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या…

15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात, तसेच त्यानंतरच्या परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या किंवा ऑनलाइन, याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू असतानाही महाविद्यालये अद्याप सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटण्यासारखे असून शासनाने तत्काळ शाळापाठोपाठ महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी होत होती.

15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये उघडू नयेत- मागणी

राज्यातील महाविद्यालये येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांमधून तिव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये उघडू नयेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ग्रामीण भागात एसटी बस अजूनही बंद आहेत. खासगी वाहनाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची जास्त भीती आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये उघडू नयेत, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 9:07 AM IST

Updated Date: January 26, 2022 9:10 AM IST