मुंबई: मुंबईकरांसाठी (Covid 19 Updates) महत्त्वाची तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका अजून टळलेला नाही. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईत (Mumbai News) कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोना प्रतिबंधात्मक लस (Corona vaccine) घेतलेल्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. (Latest Marathi news)Also Read - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ! निकटवर्तीय सईद खानला अटक

मुंबईत 23 हजारांहून अधिक नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं (Covid 19 Symptoms) आढळून आल्याचं समजतं. विशेष म्हणजे, ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही त्यांना पुन्हा कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनं (world health organization) दिलेल्या माहिती सगळ्यांची चिंता वाढवणारी आहे. सध्या संपूर्ण जगाला कोरोना प्रतिबंधक निर्बंधांच्या छायेखाली राहणं गरजेचं आहे. कोरोना संसर्ग आणि त्याचे नवीन प्रकार आणखी जोखीम वाढवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे खबरदारी हाच एकमेव उपाय असल्याचं देखील WHO नं म्हटलं आहे. Also Read - Chandigarh Kare Aashiqui: Ayushmann Khurrana चा नवा चित्रपट 'या' तारखेला रिलीज होणार

23239 लसवंतांना पुन्हा कोरोनाची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगरात 23239 लसवंतांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे. यात कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या 9000च्या घरात आहे. तर पहिला डोस घेतलेल्या रुग्णांची संख्या 14239 इतकी आहे. धक्कादायक म्हणजे यात 60 वर्षांवरील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. दुसरीकडे, गेल्या 6 महिन्यांमध्ये लशीचा एकही डोस न घेतलेले दोन तृतीयांश लोक आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. Also Read - Liquor Shops Closed: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, राजधानीत 1 ऑक्टोबरपासून दारुची दुकानं बंद राहणार

लस घेतल्यानंतरही मृत्यू

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत केलेल्या अभ्यासात चिंताजनक बाब समोर आली आहे. एकही डोस न घेतलेल्या नागरिकांचं मृत्यूचं प्रमाण 93.05 टक्के आहेत. एक लस घेतलेल्या व्यक्ती 5.97 टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचं प्रमाण 0.96 टक्के आहे.

WHO नेही वाढवली चिंता

WHO नं सांगितलं की, कोरोनाला सध्या साथीच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. जगभरातील अधिकाधिक लोकांना लस मिळेल आणि हर्ड इम्युनिटी मोठ्या प्रमाणावर विकसित होईल, तेव्हा कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या आपोआप कमी होईल. तसेच कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होईल. अशा परिस्थितीत कोरोनाला साथीच्या श्रेणीतून काढण्यात येईल.