मुंबई : कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने लसीकरण (vaccination) मोहीमेवर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे याकडे सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईमध्ये (Mumbai) 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे त्यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यास महापालिकेने (BMC) सुरुवात केली आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांनाच लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रांवर पुरुषांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.Also Read - Mumbai Local Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

शुक्रवारी मुंबईतील शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर (government and municipal vaccination centers) पुरुषांना प्रवेश मिळणार नाही. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फक्त महिलांनाच लस दिली जाणार आहे. महिलांना डायरेक्ट लसीकरण केंद्रावर येऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस (First or second dose of corona vaccine) घेता येणार आहे. या विशेष सत्रानिमित्त ऑानलाईन पूर्व नोंदणी (Online pre-registration) बंद ठेवण्यात येणार आहे. Also Read - Mumbai Local Update: 28 ऑक्टोबरपासून मुंबईची लाईफलाईन पूर्ण क्षमतेने धावणार, मध्य-पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या!

मुंबईतील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि सर्व शासकीय आणि पालिका रुग्णालय तसंच कोविड सेंटर (Covid Center) येथील लसीकर केंद्रावर महिलांना डायरेक्ट लस घेता येणार आहे. याची मुंबईतील सर्व महिलांनी नोंद घेत कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन केले जात आहे. या प्रयोगामुळे महिलांमध्ये लस घेण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 75,37,141 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. पण 32 लाख नागरिकांनी आतापर्यंत डोस घेतले नाही. Also Read - Breaking News Live Updates: NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार : नवाब मलिक