Top Recommended Stories

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! केंद्र सरकार सतर्क, राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार

Coronavirus : चीनसह चार देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य केद्र आणि सरकारने सतर्क होऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Updated: December 21, 2022 5:58 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार
राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार

Coronavirus : जगात अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. चीनमधील रुग्णालयांत रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाहीत. एवढेच नाही तर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. चीनमधील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना जिनोम सिक्वेंसिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच कोविड टास्क फोर्स गठीत करणार असल्याची माहिती दिली आहे.

आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक

चीन व्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या नवीन व्हेरिटएंच्या प्रादुर्भावामुळे भारताची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून कोविड-19 च्या नवीन प्रकारांचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाबाबत चर्चा करणार आहेत.

You may like to read

राज्यात टास्क फोर्स गठीत होणार

चीनमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. बुधवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला कोविड टास्क फोर्स आणि तज्ञांची समीती गठीत करण्याबाबात राज्य सरकारची काय तयारी आहे असा प्रश्न विचारला. तसेच कोरोनाविरोधात सर्व पक्ष मिळून राजकारण बाजूला ठेवून काम करून असे देखील अजित पवार म्हणाले. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच टास्क फोर्स आणि तज्ञांची समती गठीत करण्यात येईल अशी माहिती दिली.

भारत जोडो यात्रा थांबवा, आरोग्यमंत्र्यांचं राहुल गांधींना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात उपाययोजना आखायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) पत्र लिहून भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवण्याचे आवाहन केले आहे. ‘भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावे आमि नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी’, असे मांडवीय यांनी या पत्रात म्हटले आहे. याशिवाय मनसुख मांडवीय यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील पत्र लिहून यात्रा थाबवण्याचे आवाहन केले आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.