Top Recommended Stories

Covid Restriction: राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत

Maharashtra Covid Restriction: राज्यात पुन्हा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात मास्क सक्ती पुन्हा लागू केली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरच निर्णय घेतला जाईल असे राजेश टोपे म्हणाले.

Updated: April 27, 2022 8:54 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Punjab Covid Restriction
Image for representational purposes only

Maharashtra Covid Restriction: देशात दिल्लीसह काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमिवर राज्यात पुन्हा निर्बंध (Maharashtra Covid Restriction) लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क अनिवार्य केले जाऊ शकते असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुधवारी दिले. खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्यक (Maharashtra Mask News) करता येऊ शकतात, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरच मास्कच्या आवश्यकतेबाबत निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.

Also Read:

आरोग्यमंत्री म्हणाले की आज मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याचे आदेश देऊ शकतात. या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होणार आहे. कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर कोविडच्या टेस्टिंगचा वेग अधिक तीव्र केला जाईल. ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट वाढवले ​​जाईल. तसेच ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी ते वाढवले जाईल असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच 6 ते 12 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल अशी माहिती देखील यावेळी टोपेंनी दिली.

You may like to read

राज्यात 943 सक्रिय रुग्ण

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढली असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 153 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 943 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक 549 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतही 27 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी मुंबईत 102 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाच्या झपाट्याने वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत व्हर्च्युअल बैठक (PM CM Meet) घेतली. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की गेल्या दोन आठवड्यांत काही राज्यांमध्ये कोविड महामारीची प्रकरणे ज्या प्रकारे वाढली आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की संसर्गाचे आव्हान पूर्णपणे टळलेले नाही. देशवासियांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की सध्याची आव्हाने पाहता सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 27, 2022 8:53 PM IST

Updated Date: April 27, 2022 8:54 PM IST