Top Recommended Stories

Devendra Fadnavis Tweet Viral: 'मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...' उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर व्हायरल होतेय देवेंद्र फडणवीसांचं जुनं ट्वीट

Devendra Fadnavis Tweet Viral: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray Resignation) यांनी बुधवारी राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचा (BJP) राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अशातच 'मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...' हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे जुने ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Updated: June 30, 2022 11:38 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Devendra Fadnavis Tweet Viral: 'मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...' उद्धव ठाकरे सरकार कोसळल्यानंतर व्हायरल होतेय देवेंद्र फडणवीसांचं जुनं ट्वीट
devendra fadanvis

Devendra Fadnavis Tweet Viral: राज्यात गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष नाट्याचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने (Udhav Thackeray Resignation) झाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले तीन पक्षाचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार कोसळले.अशातच ‘मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…’ हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे जुने ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सन 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काव्यात्मक शैलीत विरोधकांना टोला लगावला होता. आता तेच ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सन 2019 मध्ये राज्यात झालेली विधानसभा निवडणूक (Assembly Election) भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. निवडणुकीत 105 जागा मिळवत भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असे जवळपास निश्चित झाले होते. परंतु दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावर समन्वयाच्या अभाव दिसून आला होता. अखेर शिवसेना आणि भाजपमधील युती तुटली. नंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

You may like to read

दुसरीकडे, सन 2018 मध्ये नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते काँग्रेसमध्ये आले. नाना पटोले यांची 1 मे 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काव्यात्मक शैलीत विरोधकांना टोला लगावला होता. ‘मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना. मैं समन्दर हूं, लौट कर जरूर आऊंगा.’, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले होते.आता उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे हेच ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाच्या पाठिंब्याने भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता स्थापण करू शकते.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>