डोंबिवली: पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर 15 जणांनी सामूहिक बलात्कार (Pune Gangrape) केल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणखी एक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gangrape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. डोंबिवली पूर्वेला असलेल्या मानपाडा पोलिस (Manpada Police) स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सोअतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.Also Read - Pune Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 12 जण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या भोपर परिसरात (Dombivli Bhopar Area) ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार (Gangrape) केला. या आरोपींपैकी 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे डोंबिवली शहर हादरले आहे. Also Read - Pune Gangwar: पुण्यात गॅंगवार! भररस्त्यात गोळीबार, 2 ठार- एक गंभीर जखमी

अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ (Rape Video) काढला होता. या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ब्लॅकमेल (Blackmail) केले जात होते. तिला फार्महाऊसवर (Farmhouse) नेऊन आरोपी आळीपाळीने बलात्कार करत होते अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला. याप्रकरणी आतापर्यंत 22 जणांवर पोलिसांनी कारवाई केली तर उर्वरितांचा शोध सुरु आहे. Also Read - BIG NEWS: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 6 गाड्या एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू