Top Recommended Stories

Driving Test In Mumbai: ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आरटीओने सुरू केली नवी सुविधा

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ड्रायव्हिंग टेस्ट देण्यापूर्वी तुम्हाला भिती वाटत असेल किंवा संकोच वाटत असेल तर आता आरटीओ कार्यालयातील सिम्युलेटर तंत्रज्ञान तुमची मदत करणार आहे.

Updated: January 17, 2022 4:41 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Noida: Parents To Be Fined If Underage Children Caught Driving
The accredited training centres can provide training for light motor vehicles (LMVs) and medium as well as heavy vehicles (HMVs).

Driving Test In Mumbai : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) देण्यापूर्वी तुम्हाला भिती वाटत असेल किंवा संकोच वाटत असेल तर आता आरटीओ (RTO) कार्यालयातील सिम्युलेटर तंत्रज्ञान (Simulator technology) तुमची मदत करणार आहे. या तत्रज्ञांनाची मदत तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी होणार आहे. मुंबईतील सर्व आरटीओमध्ये हे सिम्युलेटर मशीन (Simulator machine) लावण्यात येणार आहे.

Also Read:

झी न्यूजच्या वृत्तानुसार, मुंबईत ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license In Mumbai) मिळवण्यासाठी परवाना परीक्षा देण्याऱ्या नागरिकांना या तत्रज्ञानाची मदत होणार आहे. परवाना परीक्षेसाठी बसणारे नागरिक हे सिम्युलेटर मशिन विनामूल्य सराव (Free practice) करू शकतात आणि त्यानंतर ते परवान्यासाठी परीक्षा देऊ शकतात. हा सिम्युलेटर रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. हे यंत्र हुबेहुब खऱ्या कारप्रमाणेच बनवण्यात आले असून त्यात वेगवेगळ्या परिस्थितीनुसार प्रोग्रॅम्स (Virtual Programs) तयार करण्यात आले आहेत. यामुळे परिक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत गाडी चालवण्याचा अनुभव नसेल तर ते या मशिनच्या मदतीने आभासी स्थितीत सराव (Virtual practice) करू शकतात आणि त्यानंतर परीक्षा देऊ शकतात.

You may like to read

निशुल्क करता येणार ड्रायव्हिंगचा सराव

झी न्युजच्या वृत्तानुसार, मुंबईतील 8 मोठ्या आरटीओमध्ये अशा प्रकारचे मशीन बसविण्यात आले आहेत. या सिम्युलेटर मशीनची किंमत सुमारे 4 लाख आहे. सर्वसामान्यांच्या वापरासाठी लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या मशीनवर सराव करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही ते अगदी निशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

असा करावा लागेल वापर

हे सिम्युलेटर मशीन सुरू करण्यासाठी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना आधी त्यांचा परवाना क्रमांक भरावा करावा लागेल. त्यानंतर ज्या ठिकाणी ड्रायव्हिंगचा सराव करायचा आहे ते स्थान निवडावे लागेल आणि त्यानंतर सीटबेल्ट लावून आभासी ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येईल. हे मशीन सर्व प्रकारचे हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन प्रोग्राम केलेले आहे. यामुळे उमेदवारांना वास्तविक ड्रायव्हिंग टेस्ट देणे सोपे होणार आहे. तसेच ज्यांना ड्रायव्हिंग परीक्षेची भिती किंवा संकोच वाटतो त्यांना या सिम्युलेटरमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते.

ड्रायव्हिंग टेस्टची भीती होणार दूर

आरटीओमधील हे सिम्युलेटर मशीन लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनात प्रत्यक्ष परीक्षेबाबत काही शंका (Fear of driving test) असतील तर ते या सिम्युलेटर मशीनवर सराव करून त्यांच्या शंका दूर करून परीक्षेची तयारी करू शकतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 17, 2022 4:41 PM IST

Updated Date: January 17, 2022 4:41 PM IST