By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
ED RAID: मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या अडचणी आणखी वाढणार, श्रीधर पाटणकरांच्या इतर मालमत्ता ईडीच्या रडारवर!
ED RAID: ईडीने याआधी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली. आता श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण श्रीधर पाटणकर यांच्या इतर मालमत्ता देखील ईडीच्या रडारवर आहेत.

ED RAID: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Government) अनेक नेते आणि मंत्री ईडीच्या (ED) रडारवर आहेत. आता ईडीच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) हे देखील आहेत. ईडीने याआधी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली. आता श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण श्रीधर पाटणकर यांच्या इतर मालमत्ता देखील ईडीच्या रडारवर आहेत.
श्रीधर पाटणकरांच्या मालकिची श्री. साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि ही कंपनी आहे. या कंपनीला हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedi) याने बनावट कंपनीच्या माध्यमातून जवळपास 30 कोटींचे विनातारण कर्ज दिले. ही रक्कम पाटकणकरांनी अन्य बांधकाम प्रकल्पातही वापरली असल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडी या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. ईडीचे अधिकारी पाटणकरांच्या कंपनीने राबवलेल्या अन्य प्रकल्पांची माहिती सुद्धा गोळा करत आहेत.
ईडीने पाटणकरांची भागीदारी असलेल्या ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एक गृहनिर्माण प्रकल्पावर कारवाई करण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. याच प्रकल्पात चतुर्वेदीने आर्थिक गुंतवणूक केल्याचा ईडीला संशय आहे. यासोबत ईडीचे अधिकारी पाटणकरांच्या मुंबई आणि ठाण्यातील प्रकल्पांची झाडाझडती करत आहेत. तर या प्रकरणातील दुवा असलेल्या चतुर्वेदीच्या शोधासाठी ईडीचे पथक मुंबईबाहेर गेले आहे. चतुर्वेदीला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. पण ते चौकशीसाठी आले नाहीत. चतुर्वेदी परदेशात गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या