मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचा (Corona virus) वेग मंदावत चालला आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या कमी होत असल्याने सरकारने (Maharashtra Government) बरेच निर्बंध शिथिल केले आहेत. सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले आहेत. अशामध्ये आता शिक्षण विभागाने देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये 17 ऑगस्टपासून पहिली ते सातवीच्या शाळांचे वर्ग (education classes 1st to 7th) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी याबाबत माहिती दिली आहे.Also Read - Corona Vaccine Update: मुंबईत उद्या फक्त महिलांनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस!

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ‘राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागावर (education department) सोपवला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शुक्रवारी बैठक घेऊन याबाबत चर्चा केली. या बैठकीत 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. पण कुठल्या भागातील शाळा सुरू करायच्या याबाबतचे निकष पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत निश्चित केले जातील.’ Also Read - Ganeshotsav 2021: सावधान! गणेशोत्सवानंतर राज्यात कोरोना रुग्णात वाढ होऊ शकते, आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला इशारा

‘पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल, विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जेवणाचे डबे, मध्यंतराची सुट्टी, खेळाचे वर्ग या सगळ्यांचे नियोजन कसे करावे? यासंदर्भातला एसओपी तयार करण्याचे काम सुरु आहे. ही माहिती येत्या आठवड्यात सर्व शाळांना पाठवण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले. Also Read - Breaking News Live Updates: मोठी घोषणा! महिलांच्या रक्षणासाठी आगामी अधिवेशनात शक्ती कायदा आणणार

दरम्यान, आठवी ते दहावीच्या शाळा (calasses 8th to 10th) या 15 जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत. आठवी ते दहावीच्या जवळपास 36,835 शाळा आहेत. त्यापैकी 12,725 शाळा (School) सुरु झाल्या आहेत. या शाळांमध्ये 86,33,805 विद्यार्थी (Student) आहेत. त्यापैकी 8,98,894 विद्यार्थी शाळांमध्ये हजर राहत आहेत. एकूण शाळांच्या 34.55 टक्के शाळा सुरु झाल्या आहेत. पण विद्यार्थी संख्येपैकी फक्त 10.41 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यास पसंती दिली आहे.