मुंबई : मंत्रालयासमोर (Maharashtra Mantralaya) विष (Poison) प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. 20 ऑगस्ट रोजी या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर विष (Farmer Suicide) प्राशन केले होते. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात (G T Hospital) उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. या शेतकऱ्याच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील (Dharma Patil Suicide Case) या शेतकऱ्याने देखील मंत्रालयात अशीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.Also Read - Raj Kundra ची ऑर्थर रोड जेलमधून सूटका, 119 Porn Videos सापडल्याचा क्राईम बँचचा खुलासा

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुभाष जाधव (Subhash Jadhav) होते. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील मंचर येथील राहणारे होते. त्यांची जमीन व्यवहारामध्ये फसणूक (Fraud in land transactions) झाली होती. आरोपींनी त्यांना आणि कुटुंबियांना मारहाण करुन अर्धनग्न करत जमीन बळकावली होती, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिस (Pune Police) ठाण्यातही धाव घेतली होती. पण पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे ते चिंतेत आले होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी थेट मंत्रालयात येण्याचा निर्णय घेतला होता. Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

सुभाष जाधव यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walase-patil) यांना पत्र लिहित दाद मागण्याच प्रयत्न केला होता. 20 ऑगस्टला ते मंत्रालय परिसरात आले. त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळाला नाही. पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटवरच सोबत आणलेले कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तात्काळ जी.टी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. Also Read - Sex Racket in Pune: पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार तरुणींची सुटका